ऐन दिवाळीत व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकूण २६३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या
महाराष्ट्र सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वारे वाहत असून अवघ्या काही दिवसांवर निवडणूक येऊन थांबली असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलातील मुंबई, मिरा भाईंदर, नवी मुंबई आणि वसई विरार पोलीस आयुक्तायातील २२१ तर उर्वरित पोलीस आयुक्तालय आणि जिल्हा अधिक्षक कार्यालयातील ४२ अशा एकूण २६३ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्राच्या अनुषंगाने बदली पात्र असलेल्या पोलीस निरीक्षकांच्या एकूण २६३ बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस महासंचालक आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मिल्कार्जन्न प्रसन्ना यांनी या बदलीचे आदेश दिले आहेत. मेरा भाईंदर वसई विरार शहरातील ३८ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलीस दलातील ज्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यापैकी मिरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील एकूण ३८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षक संजय दत्तू हजारे, शैलेंद्र रघुनाथ नगरकर, रमेश पंढरीनाथ भामे, जितेंद्र बोदप्पा वनकोटी, जयराम नरसिंहराव रणवरे, सदाशिव विष्णू निकम, राजेंद्र गणपत कांबळे, विजयकुमार अधिकराव चव्हाण, राजू किसन माने, बाळासाहेब राघुजी पवार, चंद्रकांत सुधाकर सरोदे, विलास सखाराम सुपे, दिलीप हरिभाऊ राख, सुधीर निवृत्ती गवळी, प्रफुल रमेश वाघ, विवेक शांताराम सोनवणे, विजया सुखदेव पवार, राहुल कुमार अरुण पाटील, रणजीत सूर्यकांत आंधळे, संजय शांताराम केदारे, विठ्ठल वीराप्पा चौगुले, सुशीलकुमार अंकुशराव शिंदे, सुधीर अर्जुन चव्हाण, ऋषिकेश संपत पवळ, सागर चंद्रकांत टिळेकर, कुमारगौरव माधवराव धादवड, राहुल सखारामा सोनवणे, मिलिंद काळू साबळे, सचिन भारत कोतमीरे, शिवानंद शशिकर देवकर, जिलानी कादर सय्यद, श्याम आदिनाथ आपेट, मंगेश अरुणराव अंधारे, अब्दुलहक महमदगौस देसाई , अशोक कठाळू कांबळे, संतोष सोपान चौधरी, जितेंद्र युवराज पाटील व प्रकाश पांडुरंग मासाळ अशी एकूण ३८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.