केटरिंग व्यावसायिकाच्या गोडाऊनमधून ५० हजार रुपयांच्या तांब्याच्या वायर्सची चोरी, नवघर पोलिसांकडून चोराला अवघ्या दीड तासात जेरबंद
भाईंदर (इरफान सय्यद) : भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेस-४ परिसरात एका केटरिंग व्यावसायिकाच्या गोडाऊनमध्ये चोरीचा प्रकार घडला असून, नवघर पोलिसांनी तातडीने कारवाई करून अवघ्या दीड तासांत आरोपीला अटक केली आहे.
घटना कशी घडली?
इंद्रलोक फेस-४ परिसरातील बैठक कॅफेसमोर असलेल्या मोकळ्या जागेत महेंद्र मुरली शिंदे (वय ४२) यांचे केटरिंग व्यवसायासाठी पत्र्याचे आणि साईडने ताडपत्रीने झाकलेले गोडाऊन आहे. २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री अज्ञात चोरट्याने गोडाऊनच्या ताडपत्रीचे आवरण फाडून आत प्रवेश केला आणि सुमारे ५० हजार रुपयांचे तांब्याचे वायर्स चोरी केले.
फिर्याद आणि गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया
घटना लक्षात आल्यानंतर महेंद्र शिंदे यांनी १ डिसेंबर २०२४ रोजी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी एफआयआर क्रमांक ६५२/२०२४ नोंद करण्यात आला असून, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५ (a) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची जलद कारवाई
तक्रार दाखल होताच नवघर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळाची पाहणी करून उपलब्ध पुरावे आणि स्थानिकांच्या मदतीने अवघ्या दीड तासांत आरोपीला घटनास्थळाजवळून ताब्यात घेतले.
मुद्देमाल जप्तीची प्रतीक्षा
चोरी केलेले तांब्याचे वायर्स अद्याप जप्त करण्यात आलेले नाहीत. मात्र, आरोपीकडे सखोल चौकशी सुरू असून, लवकरच नवघर पोलिसांकडून मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता आहे.
[…] […]