मिरा-भाईंदर वसई-विरार: ऑगस्ट २०२५ महिन्यातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच झालेल्या मासिक बैठकीत, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला. या बैठकीत मा. पोलीस आयुक्त, श्री. निकेत कौशिक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

गुन्ह्यांच्या उत्कृष्ट तपासासाठी सन्मानित झालेले अधिकारी:

  • प्रथम क्रमांक – माणिकपूर पोलीस ठाणे:
    • माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल एका गंभीर गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेने कौशल्यपूर्ण तपास केला. यामध्ये एका अज्ञात चोरट्याने घरात घुसून लाखो रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरले होते. तपासात फिर्यादीच्या गुजरात येथील एका नातेवाईकाचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी ज्योती भानुशाली या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा तिने पुरुषाचा वेष धारण करून गुन्हा केल्याची कबुली दिली. तिच्याकडून रु. १,५०,८४,०५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

 

 

 

 

 

 

    • या कामगिरीसाठी सपोनिरी. दत्तात्रय सरक आणि त्यांच्या पथकातील अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला.
  • द्वितीय क्रमांक – काशिमीरा पोलीस ठाणे:
    • काशिमीरा पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे छापा टाकून सात दरोडेखोरांना पकडले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, कार आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. या तपासात आरोपींचे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांशी संबंध असल्याचे समोर आले. आरोपींविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

  • या कामगिरीसाठी पोनि. राहुल राख आणि त्यांच्या टीमला गौरवण्यात आले.
  • तृतीय क्रमांक – पेल्हार पोलीस ठाणे:
    • पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथकाने अत्यंत परिश्रम घेतले. एका कंपनीतून ६.५० लाख रुपयांचे तांब्याचे भांडे आणि कच्चा माल चोरीला गेला होता. पोलिसांनी बीड, परळी वैजनाथ आणि उस्मानाबाद येथे जाऊन दोन आरोपींना अटक केली आणि चोरीला गेलेला १००% मुद्देमाल जप्त केला.

 

 

 

 

 

 

 

 

 

    • या कामगिरीसाठी वपोनि. जितेंद्र वनकोटी आणि त्यांच्या पथकाचा सत्कार करण्यात आला.
  • चतुर्थ क्रमांक – वालीव पोलीस ठाणे:
    • वालीव पोलिसांनी एका वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना एक आरोपी ताब्यात घेतला. त्याच्या चौकशीतून मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील एकूण ४ वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. पोलिसांनी एकूण २ लाख रुपयांची वाहने जप्त केली आहेत.

 

 

 

 

 

 

 

    • या कामगिरीसाठी वपोनि. दिलीप घुगे आणि त्यांच्या टीमला प्रशस्तीपत्र देण्यात आले.

दोषसिद्धीसाठी सन्मानित झालेले पोलीस अधिकारी:

या बैठकीत गुन्हे सिद्धीसाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये नयानगर पोलीस ठाण्याचे पोउपनि. मिलिंद बोरसे यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात २०२० मधील एका NDPS कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीला कोर्टाने दोषी ठरवत २ वर्षे, १ महिना आणि १७ दिवसांची शिक्षा तसेच १०,००० रुपयांचा दंड ठोठावला. या कामगिरीसाठी पोउपनि. बोरसे आणि त्यांच्या टीमला प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

धार्मिक तेढ वाढवणाऱ्या जाहिरातींवर कडक कारवाई होणार – बांधकाम व्यावसायिकांचा परवाना रद्द करण्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांचे निर्देश

मिरा-भाईंदर, दि. ६ सप्टेंबर: धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या जाहिरातींचा वापर करून ग्राहकांना…