सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी) 05 डिसेंबर: नवी मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने बुधवारी मध्यरात्री बेलापूर गावातील कब्रस्तानासमोरच्या परिसरात धाड टाकून १४३ ग्रॅम अत्यंत महागडा व प्रतिबंधित ड्रग्सचा साठा जप्त केला. बाजारात या खेपेची किंमत काही कोट्यवधी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत वेगवेगळ्या प्रकारचे नशील्य पदार्थांचा मोठा स्टॉक हस्तगत झाला आहे.मात्र, ही कारवाई झाल्यापासून २४ तास उलटूनही पोलिसांनी कोणालाही अटक केली की नाही, केली असेल तर किती जणांना, ड्रग्सचे स्रोत काय आणि हे नेटवर्क कोठपर्यंत पसरले आहे याबाबत एक ओळही स्पष्ट केलेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त होऊनही पोलिसांची ही अस्पष्टता आणि मौन संशयाला बळ देत आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही खेप आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीच्या रॅकेटशी जोडली गेलेली असण्याची शक्यता आहे. तरीही अँटी नार्कोटिक्स सेलने “तपास सुरू आहे, योग्य वेळी माहिती देऊ” असे साधे वाक्य सांगून बोली लावली आहे.बेलापूर गाव आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. “रात्री-अपरात्री कब्रस्तानाजवळ एवढे ड्रग्स? हे सगळे कधीपासून चालू आहे? आमची मुले सुरक्षित आहेत का?” असे प्रश्न विचारले जात आहेत. गेल्या काही महिन्यांत नवी मुंबईत ड्रग्सच्या छाप्यांची संख्या वाढली असली, तरी प्रत्येक वेळी मोठ्या माशांना पकडण्याऐवजी फक्त खेप जप्त करून प्रकरण थंड केले जाते, असा आरोप स्थानिक करत आहेत.आता सर्वांच्या नजरा एकाच प्रश्नावर खिळल्या आहेत –

एवढी मोठी खेप सापडली… तरी मुख्य सूत्रधार का अद्याप मोकाट?नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी तात्काळ पारदर्शकता दाखवावी आणि जनतेला खरे तर काय घडले ते सांगावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

Devendra Fadnavis in Davos दावोसमध्ये महाराष्ट्राने केले 15.70 लाख कोटींच्या 54 सामंजस्य करारांची स्वाक्षरी

दावोस (23 जानेवारी): (Devendra Fadnavis in Davos) In वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर…