मिरा-भाईंदर : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून उद्या दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. यासाठी मीरा-भाईंदर महानगरपालिकेने (MBMC) पर्यावरणपूरक विसर्जनासाठी विशेष नियोजन केले आहे. याअंतर्गत शहरभरात ३२ कृत्रिम तलाव आणि १५ संकलन केंद्रे उभारण्यात आली असून सर्व नागरिक आणि गणेश मंडळांना याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले की, “महानगरपालिका केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, उच्च न्यायालय आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत असून सहा फूटाखालील श्रीगणेश मूर्ती कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित करणे बंधनकारक आहे
त्यांनी नागरिकांना थर्माकोल, प्लास्टिकच्या सजावटी टाळून पर्यावरणपूरक साहित्य वापरण्याचे आणि लहान प्रतीकात्मक मूर्ती स्वीकारून पुढील वर्षी पुन्हा वापरण्याचे आवाहन केले आहे.
प्रभागनिहाय कृत्रिम तलावांची यादी :
प्रभाग समिती क्र. 01
-
उत्तन समुद्र किनारा – १
-
मोर्वा स्व. सोन्या पाटील तलाव – १
-
राई राम मंदिर तलाव – १
-
मुर्धा गाव देवी तलाव – १
-
सुभाषचंद्र बोस मैदान – १
-
भाईंदर (प.) नगरभवन – १
-
भाईंदर (प.) महेश्वरी भवन रोड – १
प्रभाग समिती क्र. 02
-
भाईंदर (प.) राव तलाव – १
-
भाईंदर (प.) मेरी टाईम बोर्ड जेट्टी – १
प्रभाग समिती क्र. 03
-
भाईंदर (पू.) जेसल पार्क चौपाटी – १
-
भाईंदर (पू.) बालाजी मैदान – १
-
भाईंदर (पू.) जुनी चौपाटी – २
-
भाईंदर (पू.) नवघर एस.एन. कॉलेज समोरील तलाव – १
-
भाईंदर (पू.) स्व. आनंद दिघे मैदान – १
प्रभाग समिती क्र. 04
-
भाईंदर (पू.) गोडदेव तलाव – १
-
मिरारोड (पू.) शिवार गार्डन – ४
-
भाईंदर (पू.) आरक्षण क्र. 221 स्व. बाळासाहेब ठाकरे मैदान – १
-
भाईंदर (पू.) आरक्षण क्र. 246 – १
-
घोडबंदर उघाडी – १
-
रेती बंदर समुद्र किनारा – १
-
आरक्षण क्र. 314 विनय नगर – १
-
लक्ष्मीबाग तलाव – १
प्रभाग समिती क्र. 05
-
मिरारोड (पू.) जॉगर्स पार्क – १
प्रभाग समिती क्र. 06
-
पेणकरपाडा सुकाला तलाव – २
-
एम.आय.डी.सी सातकरी तलाव – १
-
जरीमरी तलाव काशिमिरा – १
-
चेना नदी – १
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना :
-
सहा फूटांपेक्षा मोठ्या POP मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे.
-
थर्माकोल, प्लास्टिकच्या सजावट वस्तूंचा वापर टाळावा.
-
नैसर्गिक, पर्यावरणपूरक सजावट साहित्य वापरावे.
-
मंडळांनी शक्यतो लहान मूर्ती स्वीकारून पुनर्वापर करण्याची पद्धत जोपासावी.
महापालिकेने सर्व कृत्रिम तलाव आणि संकलन केंद्रांची यादी आपल्या अधिकृत संकेतस्थळावर www.mbmc.gov.in उपलब्ध करून दिली आहे.
पाहणी दौरा व प्रशासनाचा आढावा
श्रीगणेशोत्सव 2025 विसर्जन निमित्त मिरा-भाईंदर महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक राधाबिनोद अ. शर्मा (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली 26 ऑगस्ट रोजी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत, पोलिस उपायुक्त राहुल चव्हाण (भा.पो.से.), शहर अभियंता दिपक खांबित यांनी शहरातील विविध प्रमुख कृत्रिम तलावांना भेट देऊन तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
काशिमीरा जरीमरी तलाव, सातकरी तलाव मिरा रोड, साईदत्त तलाव पेणकरपाडा, शिवार गार्डन तलाव, जेसल पार्क चौपाटी, भाईंदर पश्चिम चौपाटी, राई तलाव, मुर्धा तलाव अशा ठिकाणची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान स्वच्छता, वीजपुरवठा व प्रकाशयोजना, वैद्यकीय सुविधा, पोलीस सुरक्षा आणि नागरिकांसाठी सोयीसुविधांची तयारी तपासण्यात आली.
३३ कृत्रिम तलावांसोबत मूर्ती स्वीकृती केंद्रही उभारण्यात आले आहेत. सहा फूटाखालील श्रीगणेश मूर्ती कृत्रिम तलावांमध्येच विसर्जित करणे बंधनकारक आहे. निर्माल्य व पूजासाहित्य स्वतंत्र जमा करून महापालिकेस सहकार्य करावे. तलाव, समुद्र व खाड्यांमध्ये प्लास्टिक टाकू नये.
महानगरपालिका प्रशासनाने आवाहन केले आहे की, “श्रीगणेशोत्सव हा सामाजिक ऐक्य व पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा उत्सव आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छता, सुरक्षितता व पर्यावरण संरक्षण यांना प्राधान्य देत शिस्तबद्धरीत्या विसर्जन करावे.”