मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघाची जागा भाजप कडे असणार की शिवसेना दावा करणार ?
भाईंदर : मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघाची लढत नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. २०१९ मध्ये देखील माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन निवडणुकीच्या रिंगणात होते. २०१९ मध्ये विद्यमान आमदार गीता जैन यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा १५ हजार ५२६ मतांनी दारूण पराभव केला होता. आता विधानसभाच्या २०२४ च्या निवडणुकीत अजूनही भाजपकडून अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. भाजप मधून तिकीट मिळवण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन प्रयत्न करत आहेत. मात्र विद्यमान आमदार गीता जैन भाजप सह शिंदेच्या शिवसेनेतून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आता शिंदेच्या शिवसेनेने या मतदारसंघावर दावा सांगितला असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. माजी आमदार नरेंद्र मेहता आणि विद्यमान आमदार गीता जैन यांच्यात तिकीट मिळवण्यासाठी असलेली वरचढ पाहता याचा फायदा शिंदेच्या शिवसेनेला होऊ शकतो या अनुषंगाने शिंदेची शिवसेना या मतदारसंघावर दावा करत आहे.
हे देखील वाचा : शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पाहा कुणाकुणाला संधी मिळाली !!!
एकीकडे विद्यमान आमदार गीता जैन शिंदेच्या शिवसेनेतून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असताना शिंदे गटातील मिरा भाईंदरचे विक्रम प्रताप सिंह देखील इच्छुक आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विक्रम सिंग यांना उमेदवारी मिळावी याकरिता पत्र पाठवले आहे. मिरा-भाईंदरमध्ये उमेदवारीवरून आजी माजी आमदारांमध्ये सुरु असलेली वरचढ पाहता भविष्यात भाजप व शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मेहता यांचा प्रचार मात्र सुरु!!!
विधानसभाच्या २०२४ च्या निवडणुकीत अजूनही भाजपकडून अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आला नसला तरी विद्यमान आमदार गीता जैन आणि मेहता यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघात आपली ताकद दाखवण्यासाठी गेल्या आठवड्यात संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं होत आणि याच संकल्प सभेत माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आपली ताकद दाखवली होती. मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघासाठी तिकीट मिळण्यासाठी मेहता यांच्याकडून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मात्र शहरात भाजपची ताकद किती आहे हे नरेंद्र मेहता यांनी या सभेतून दाखवून दिले आहे. या संकल्प सभेत ४० हून अधिक भाजपचे माजी नगरसेवक, माजी महापौर जोसना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोतसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दोन्ही पक्षात इनकमिंग सुरूच
शिवसेना शिंदे गटाकडून या मतदार संघात राजकीय बांधणी सुरू असून काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेतील अनिके पदाधिकार्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच मिरा भाईंदर भाजप पक्षात देखील पक्ष प्रवेश होत आहे.
[…] हे देखील वाचा : मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघाची… […]