काँग्रेसची पहिली यादी जाहीर, ४८ उमेदवार जाहीर, मिरा भाईंदर १४५ मधून मुझ्झफर हुसैन यांना उमेदवारी जाहीर

भाईंदर : विधानसभा निवडणुकीसाठी अखेर काँग्रेस पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ४८ जणांची नावे जाहीर करण्यात आली. महाविकास आघाडी पक्षातील तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. महाविकास आघाडीच्या काल झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी ८५ उमेदवार असतील, अशी घोषणा करण्यात आली होती. शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने त्यांच्या याद्याजाहीर केल्यानंतर सर्वात शेवटी काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे.

हे देखील वाचा : मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघाची जागा भाजप कडे असणार की शिवसेना दावा करणार ?

मिरा भाईंदर शहरातून मुजफ्फर हुसेन यांना उमेदवारी जाहीर झाली असून कराड दक्षिण येथून पृथ्वीराज चव्हाण, साकोलीतून नाना पटोले, उत्तर नागपूरमधून नितीन राऊत, पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे, देवळी (वर्धा)मधून रणजित कांबळे, राजूरा ( चंद्रपूर)मतदार संघातून सुभाष धोटे, धामणगावमधून विरेंद्र जगताप,तिवसातून यशोमती ठाकूर, ब्रम्हपुरीतून विजय वडेट्टीवार रिसोडमधून अमित झनक, अमरावती शहरमधू डॉ सुनील देशमुख, अचलपूरमधून बबलू देशमुख तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

काँग्रेस पक्षाने जाहीर केलेली 48 उमेदवारांची पहिली यादी

1.कलकुवा – ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)
3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर –  श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)
5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण –  कुणाल रोहिदास पाटील
7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक
11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख
13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध @ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम –  प्रफुल्ल विनोदराव गुडधे
17.नागपूर मध्यवर्ती –  बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम –  विकास पी. ठाकरे
19.नागपूर उत्तर – SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली –  नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
21.गोंदिया-  गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा-  सुभाष रामचंद्रराव धोटे
23.ब्रह्मपुरी –  विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर –  सतीश मनोहरराव वारजूकर
25.हदगाव –  माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर-  तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
29 फुलंब्री –  विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे
37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख
41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे
43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)
47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
You May Also Like

Opposition MPs Suspended From Lok Sabha लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतील 34 विरोधी खासदारांचेही निलंबन, एकाच दिवसात 67 खासदारांचे निलंबन

राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ सुरु आहे. लोकसभेनंतर सोमवारी राज्यसभेतूनही 34 विरोधी…

वसंत मोरे लोकसभा निवडणूक आता अपक्ष म्हणून लढत देणार Vasant More WhatsApp Status

Vasant More WhatsApp Status : वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक (Loksabha ELection…

ठाण्याची लोकसभेची जागा कोणाच्या नावावर होणार ?

ठाण्याची लोकसभेची जागा कोणाच्या नावावर होणार? एकनाथ शिंदे यांचा शिलेदार की उद्धव…

एग्जिट पोल प्रमाणे 400 पार; सलग तिसऱ्यांदा Narendra Modi प्रधानमंत्री बनणार ?

एग्जिट पोल प्रमाणे 400 पार; सलग तिसऱ्यांदा Narendra Modi प्रधानमंत्री बनणार ?…

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result : महायुतीने मैदान मारलं

मुंबई Mumbai, दि. १३ जुलै, (प्रतिनिधी): Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result…

मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघाची जागा भाजप कडे असणार की शिवसेना दावा करणार ?

मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघाची जागा भाजप कडे असणार की शिवसेना दावा…