केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ११ नोव्हेंबर २०२४ रोजी भाईंदर येथील व्यावसायिक आणि उद्योजकांच्या सभेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत ८० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठरवले. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राचा विकास पारदर्शक आणि भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनांमुळे साधता येईल.

पीयूष गोयल म्हणाले की, सरकारने सार्वजनिक योजना पारदर्शकपणे राबवल्यामुळे आता करदात्यांचे पैसे गळतीत जाणे थांबले आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी मुद्रा कर्जाच्या माध्यमातून ५५% महिलांना लाभ मिळाला आहे. त्याचप्रमाणे, आरोग्य, स्वच्छता आणि अन्न वितरण प्रणालीच्या सुधारणा करत समाजातील गरीब लोकांना अधिक लाभ मिळवून दिला जात आहे.

गोयल यांनी स्थानिक विकास प्रकल्पांचीही माहिती दिली. बोरीवलीपासून कोकणपर्यंत नवीन ट्रेन सेवा आणि भायंदरपर्यंत किनारी रस्ता विस्तार यांसारखे प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. त्यासाठी पर्यावरण मंजुरी मिळालेली आहे. गोयल यांनी “ट्रिपल इंजिन सरकार”चा उल्लेख करत केंद्र, राज्य आणि महापालिका यांचा एकसारखा समन्वय साधून मुंबईकरांसाठी अधिक सुविधा उपलब्ध कराव्यात, असा संदेश दिला.

 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
You May Also Like

मराठी बातम्या | मुंबईत कलम 144 अन्वये 18 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू | Marathi Batmya

मराठी बातम्या | Marathi Batmya Prohibitory orders under section 144 imposed in…

मुंबईची हवा दिल्ली पेक्षाही धोकादायक, किनारी भागाच्या हवेतील कण थेट रक्तात जाऊ शकतात !

मुंबईतील वायू  प्रदूषणावर (Mumbai AIr Pollution) लक्ष ठेवणारी आणि या दिशेने काम…

धारावी प्रकल्पावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला, म्हणाले- तोडगा निघाला नाही का?

Raj Thackeray’s question to Uddhav Thackeray on Dharavi Project; धारावी प्रकल्पावरून राज…

CSMT प्लाटफॉर्म वर रेल्वेच्या नियमांच उल्लंघन करणाऱ्या सीमा कनोजियाला पोलिसांनी चांगलीच तंबी दिली.

सोशल मीडिया हे कंटेंट बनवणाऱ्यांसाठी व त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि जगभरातील…

CID फेम वैष्णवी धनराजने कुटुंबावर केले गंभीर आरोप, म्हणाली- मालमत्तेसाठी मारहाण केली

३५ वर्षांची वैष्णवी धनराज ही सीआयडी, बेपन्ना आणि मधुबाला यांसारख्या टीव्ही शोमध्ये…

उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अदानी समूहाचा खुलासा “धारावी प्रकल्पाच्या अटी ‘मविआ’च्या काळातील”

मुंबई दि. १६ डिसेंबर : धारावी पुर्नरविकास प्रकल्पाविरोधात अदानी (Adani ) उद्योग…