मिरा रोड : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बसमधील प्रवाशांचे मोबाईल फोन जबरी चोरी करून चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. यावर गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
(Kashimira police bust gang that stole mobile phones from passengers on buses) काशिमिरा पोलिस ठाण्यात दि. ०६/०२/२०२५ रोजी भारतीय दंड संहिता २०२३ कलम ३१०(२), ३०९(४), ३(५) ३०९(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान काशिमिरा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या अधिकाऱ्यांना मारुती एस प्रेसो कार क्र. MH-01/DR8455 मध्ये बसलेल्या ६ इसमांची हालचाल संशयास्पद वाटली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पंचासमक्ष अंगझडती केली असता त्यांच्याकडे एकूण १२ मोबाईल फोन हस्तगत केले. यातील एक निळ्या रंगाचा रेडमी नोट ९ प्रो मॅक्स आयएमईआय नंबर ६८४४८०४९१९१२९१/८६८४४८०४९१९१३०९ हा मोबाईल चोरीला गेलेला असल्याचे तपासात उघड झाले.
पोलिसांनी या ६ आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला. आरोपींच्या नावांची माहिती पुढीलप्रमाणे आहे: १. अन्यर गफुर सय्यद (वय ४१ वर्षे, रा. मुंब्रा, ठाणे) २. समीर बशीर अन्सारी ऊर्फ बचकाना (वय ३२ वर्षे, रा. मुंब्रा, ठाणे) ३. मोहम्मद अफजल मोहम्मद वजीर शेख (वय ३९ वर्षे, रा. मुंब्रा, ठाणे) ४. सलीम अब्दुल रहमान शेख (वय ४६ वर्षे, रा. मुंब्रा, ठाणे) ५. अफरोज अहमद शेख (वय २८ वर्षे, रा. मुंब्रा, ठाणे) ६. मोहम्मद सुलतान अब्दुल कय्युम खान ऊर्फ लाला (वय २७ वर्षे, रा. मुंब्रा, ठाणे) या आरोपींच्या ताब्यात घेतलेल्या मोबाईल फोनसह त्यांना दि. ०६/०२/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.
हस्तगत मुद्देमाल:
- ३,०१,५००/- रुपये किंमतीचे मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले आहेत. तपासादरम्यान काशिमिरा पोलिस ठाणे आणि इतर पोलीस ठाण्यांमध्ये या आरोपींच्या नावाने संबंधित गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात मोबाईल चोरी आणि चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत.
तपासामध्ये काशिमिरा पोलिस ठाणे, दहिसर पोलिस ठाणे, आणि कासारवडवली पोलिस ठाणे यामध्ये आरोपींवर विविध गुन्हे दाखल आहेत.
हे हि वाचा : बनावट व्हीसा व पासपोर्ट वापरून वास्तव्य करणारे ३ नायझेरीयन नागरिकांना अटक
आरोपींची पार्श्वभूमी व गुन्हे इतिहासाची माहिती:
- आरोपींवर पूर्वीपासून मोबाईल चोरी आणि चोरीसारख्या गुन्ह्यांचा इतिहास आहे.
- काशिमिरा पोलीस ठाणे – गु रजि नं. ५९/२५ भा. न्या. सं चे कलम ३१० (२), ३०९ (४), ३(५)
- काशिमिरा पोलीस ठाणे – गु रजि नं. ६०/२५ भान्या से चे कलम ३१०(२), ३०९ (४),३ (५)
- काशिमिरा पोलीस ठाणे – गु रजि नं. ४०/२५ भा न्या से चे कलम ३०३ (२) प्रमाणे
- दहिसर पो ठाणे, मुंबई – गु रजि नं. ११४/२५ भा न्या सं चे कलम ३०३ (२) प्रमाणे
- दहिसर पो ठाणे, मुंबई – गु रजि नं. ११६/२५ भा न्या सं चे कलम ३०३ (२) प्रमाणे
- कासारवडवली पो. ठाणे, ठाणे शहर – गु रजि नं. १३९/२५ भा न्या सं चे कलम ३०३ (२) प्रमाणे
- काशिमिरा पोलिस ठाण्याच्यावतीने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांचा तपास सुरू आहे.
काशिमिरा पोलिसांची व तपास अधिकाऱ्यांची या :
सपोनि योगेश काळे यांच्या नेतृत्वाखाली, पो.नि. शिवाजी खाडे, पो.हवा सोनकांबळे, निलेश शिदे, सतिश निकम, स्वप्नील मोहिले, पोशि राजेंद्र सूर्यवंशी, मनोज ठोबळे, संदिप चौधरी यांचे कष्टाने हा तपास पार पडला आहे.
मार्गदर्शन:
- मा. श्री. मुधकर पांडे, पोलीस आयुक्त
- मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त
- मा. श्री. प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त
- मा. श्री. विजय मराठे, सहा. पोलीस आयुक्त
- व.पो.नि. राजेंद्र कांबळे, पो.नि. समीर शेख (गुन्हे)
या प्रकरणात पुढील तपास सुरू असून आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे.