मुंबई दि. १६ डिसेंबर : धारावी पुर्नरविकास प्रकल्पाविरोधात अदानी (Adani ) उद्योग समूहाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला . धारावी वाचवा असा नारा देत प्रचंड मोठा मोर्चा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित काढण्यात आला. स्वत: उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. धारावी ते बीकेसी दरम्यान आज भगवं तुफान अवतरलं होतं. सर्व कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे होते. या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. धारावी टी जंक्शनपासून उद्धव ठाकरे पायी चालत बीकेसीपर्यंत आले. अदानी (Adani ) उद्योग समूहाला देण्यात आलेल्या धारावी प्रकल्पात त्रुटी असल्याने या प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांच्या तर्फे विरोध करण्यात येत आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्प विरोधात अदानी उद्योग समूह विरोधात उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चा काढत आदानी उद्योग समूहाला धारेवर धरले. अदानी उद्योग समूहाकडून होत असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पा विरोधात उद्धव ठाकरेंनी समूहासह शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. त्यानंतर काही तासातच अदानी समूहाकडून पत्र काढून खुलासा करण्यात आला आहे. धारावीच्या प्रकल्पाच्या अटी महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे असं अदानी समूहाचं म्हणणं आहे.
उद्धव ठाकरे च्या सभेनंतर अदानी समूहाने पत्र काढून म्हटल आहे की, “धारावी प्रकल्प निष्पक्ष, खुल्या आणि आंतरराष्ट्रीय बोलीद्वारे अदानी समूहाला मिळाला आहे. धारावी प्रकल्पाच्या अटी महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील आहेत. निविदा प्रक्रियेनंतर अटींमध्ये अदानी समूहाने कुठलाही बदल केला नाही. त्यामुळे अदानी समूहाला कुठलाही लाभ झाल्याचा दावा करणे चुकीच आहे.”
[…] […]