मुंबई, २१ मे २०२५ (प्रतिनिधी) – FYJC ADMISSION 2025-26 महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने इयत्ता ११ वी (FYJC) साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली आहे. दिनांक १९ मे २०२५ रोजी हे पोर्टल विद्यार्थ्यांमध्ये सरावासाठी सुरू करण्यात आले होते. या सराव प्रक्रियेदरम्यान राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून, पालकांकडून, तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिकाऱ्यांकडून अनेक उपयुक्त सूचना प्राप्त झाल्या. त्या सूचनांचा विचार करून प्रवेश प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

शिक्षण विभागाने यापूर्वी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, फेरी क्रमांक १ अंतर्गत विद्यार्थी नोंदणी व पसंतीक्रम भरताना काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे, २१ मे रोजी विद्यार्थ्यांची नोंदणी व पसंतीक्रम प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर विभागाने सुधारित वेळापत्रक २२ मे २०२५ रोजी दुपारी ३ वाजता जाहीर करण्याचे ठरवले आहे.

 

विद्यार्थ्यांना मिळणार भरपूर वेळ व सुविधा

FYJC ADMISSION 2025-26 जरी पोर्टल सुरू होण्यास विलंब झाला असला, तरी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अर्ज भरणे व पसंतीक्रम नोंदविण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जाणार आहे. तांत्रिक सुधारणा पूर्ण झाल्यानंतरच पोर्टल सुरु केले जाईल, जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या त्रुटीशिवाय सोयीस्करपणे अर्ज प्रक्रिया पार पडू शकेल. अर्ज सुरू होण्याची अचूक वेळ पोर्टलवर व ई-मेल/मोबाईल संदेशांद्वारे विद्यार्थ्यांना कळविण्यात येईल.

 

पालक व विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना
  • गोंधळून न जाता संयम बाळगावा
  • प्रत्येक टप्प्यासाठी योग्य मार्गदर्शन व मदत मिळणार
  • प्रवेश प्रक्रिया जलद, सुलभ व पारदर्शक ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत

अधिकृत संकेतस्थळ:

https://mahafyjcadmissions.in

ई-मेल आयडी:

su*****@****************ns.in

हेल्पलाईन क्रमांक: ८५३०१५५५६४

सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी व नियमित अपडेट्ससाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावे.

 

ही माहिती सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी लक्षात घ्यावी आणि प्रसारमाध्यमांनीही याची योग्य ती प्रसिध्दी द्यावी, अशी विनंती शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे.

 

Leave a Reply
You May Also Like

मराठी बातम्या | मुंबईत कलम 144 अन्वये 18 जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू | Marathi Batmya

मराठी बातम्या | Marathi Batmya Prohibitory orders under section 144 imposed in…