मिरा रोड, (इरफान सय्यद) : खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणारा आरोपीला गुजरात येथून अटक करण्यात आली आहे. फोटो प्रसारित करण्याची धमकी देऊन ५०,००० रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात खंडणी उकळणाऱ्या आरोपीस नवघर पोलीस ठाणे अंतर्गत खंडणी विरोधी पथकाने गुजरात येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारी विरोधात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.

 

फिर्यादी श्री. नरेश जसाराम चौधरी (वय २० वर्षे, रा. रुम नं. १०३, कृष्णा दीप सोसायटी, नवघर रोड, साईबाबा नगर, भायंदर पूर्व) यांच्या मोबाईलमधील खाजगी फोटो आरोपीने फसवणूक करून मिळवले. आरोपीने ते फोटो ऑनलाईन व्हायरल करण्याची धमकी दिली व त्यांच्याकडून रोख आणि ऑनलाईन स्वरूपात ५०,००० रुपये उकळले. त्यानंतरही आरोपीने अजून पैशांची मागणी केली.

ही बातमी देखील वाचा: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नालेसफाई कामात ठेकेदाराची मोठी हलगर्जी; महापालिकेने ठोठावला १०% दंड

या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यात दिनांक १७ मे २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता गु. र. नं. १२२३/२०२५ नोंदवून, भा. दं. सं. कलम ३०८(२), ३०८(३) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६६, ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 

या गुन्ह्यातील आरोपीचा ठावठिकाणा न मिळाल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. राहुल राख यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. या पथकात सपोनि. विजयेंद्र आंबवडे, पोउनि. ओंकार कोये, सपोउनि. शकील पठाण, पोहवा. सतिष जगताप, पोहवा. अनिल नागरे यांचा समावेश होता.

 

तांत्रिक विश्लेषण आणि सायबर तपासाद्वारे आरोपीबाबत माहिती गोळा करण्यात आली. आरोपी अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची खात्री झाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी मुकेश कांतीलाल राजपुरोहित (वय २४ वर्षे, रा. ए-१/५०१, श्रीमद इलेगेन्स, निकोल, अहमदाबाद, मूळ रा. कुकामेढा, पाघोडा, जि. जालौर, राजस्थान) याला अटक करण्यात आली व पुढील चौकशीसाठी नवघर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.

 

ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री. मधुकर पांडेय, अपर पोलीस आयुक्त श्री. दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा आणि सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 

या कारवाईमुळे सायबर खंडणीच्या गुन्ह्यांवर पोलिसांकडून दिला जाणारा कठोर पवित्रा दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मीरा भाईंदर मध्ये प्रदूषण करणारे मेसर्स काँक्रीटटेक RMC Plant बंद करण्याचे आदेश.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) ठाणे प्रादेशिक विभागाने मीरा-भाईंदरमधील आरएमसी प्लांटवर कारवाई…