सत्य परिचित – भाईंदर (इरफान सय्यद), १२ नोव्हेंबर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला सार्वजनिक ठिकाणी चापट मारल्याच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात न्यायालयाने माजी आमदार गीता जैन यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अर्जावर न्यायालयाने हा आदेश दिला असून, काशीमिरा पोलिसांना भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 352, 353, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले आहेत.

हा व्हिडिओ 2023 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्या वेळी मिरा-भाईंदरच्या आमदार असलेल्या गीता जैन या नगरपालिकेच्या दोन अभियंत्यांवर संतापल्या असून, एका कनिष्ठ अभियंत्याला (शुभम पाटील) चापट मारताना दिसतात. हे अभियंते एका घराच्या अतिक्रमणावरील कारवाईसाठी गेले असताना, घर पाडल्याने त्यातील रहिवासी – महिलांपासून लेकरांपर्यंत – पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावर आले होते.

व्हिडिओत जैन या अभियंत्याचा कॉलर धरताना आणि त्याच्यावर आरडाओरड करताना दिसतात. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी माध्यमांना सांगितले होते, “महिलांच्या डोळ्यांतून अश्रू येत असताना तो अधिकारी हसत होता, ते पाहून माझा ताबा सुटला. मी कायदा मोडला हे मला मान्य आहे, पण त्या क्षणी ती कृती आपोआप झाली,” असे गीता जैन यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले होते.

या प्रकरणी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील आणि संजय सोनी यांनी प्रारंभी तक्रार दिली होती, मात्र नंतर ती वैयक्तिक कारणास्तव मागे घेतली. तरीही, आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून पोलिसांना FIR नोंदविण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, “सार्वजनिक सेवकांवर हल्ला हा केवळ वैयक्तिक नव्हे, तर सार्वजनिक विश्वासाचा भंग आहे. अशा प्रकरणात तक्रार मागे घेतली तरी पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे बंधन आहे.”

त्यामुळे आता माजी आमदार गीता जैन यांच्यावर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल होणार असून, पोलिस तपासाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता माजी आमदार गीता जैन यांच्यावर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल होणार आहे.

मात्र, या न्यायालयीन निर्णयावर माजी आमदार गीता जैन स्थगिती (Stay Order) घेणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात आणि स्थानिक प्रशासनात या निर्णयाची मोठी चर्चा सुरू आहे.

Leave a Reply
You May Also Like

ठाण्यात जुन्या वैमनस्यातून पंचायत समितीच्या माजी सभापतीवर एका व्यक्तीचा हात कापल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुरबाड तालुक्यात जुन्या वैमनस्यातून शुक्रवारी ठाणे ग्रामीणमधील एका गावातील पंचायत समितीच्या माजी…