सेंट अलॉयसियस इंग्लिश हाय स्कूलचा विराज दास कराटेमध्ये राज्यात अव्वल

सत्य परिचित – भाईंदर (इरफान सय्यद), २५ नोव्हेंबर : राज्यस्तरीय शालेय कराटे स्पर्धेत मिरा-भाईंदर (पूर्व) येथील सेंट अलॉयसियस इंग्लिश हाय स्कूलचा विद्यार्थी विराज दास याने प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बारामती येथे झालेल्या या स्पर्धेत उत्कृष्ट तंत्र, नेमकेपणा आणि दमदार खेलकामगिरीच्या जोरावर विराजने राज्यातील प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत अव्वल स्थान मिळवले.

शैक्षणिक अभ्यासाबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारी सेंट अलॉयसियस इंग्लिश हाय स्कूल ही मिरा-भाईंदरमधील अग्रगण्य संस्था आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक वातावरण दिल्यामुळेच गेल्या काही वर्षांपासून अनेक विद्यार्थी राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत.

आठवीत शिक्षण घेत असलेला विराज दास कराटेचे नियमित व कठोर प्रशिक्षण घेत होता. त्याच्या चिकाटी, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने राज्यस्तरावर भक्कम कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला.

विराजच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आज शाळेतर्फे भव्य स्वागत रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उपस्थितीने शाळा परिसर उत्साहात न्हाऊन निघाला.

या वेळी शाळेचे मुख्याध्यापक व कराटे प्रशिक्षकांनी विराजचे कौतुक करत सांगितले की,
“सेंट अलॉयसियस शाळा क्रीडेला सदैव प्राधान्य देते. आमच्या विद्यार्थ्यांनी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सातत्याने यश मिळवणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

विराजच्या या कामगिरीमुळे मिरा-भाईंदरमध्ये आनंदाचे व सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पालक, शिक्षक आणि प्रशिक्षकांच्या सहकार्यामुळेच या यशाला अधिक उजाळा मिळाल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आगामी काळात विराज दास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही निश्चितच पुढे झेप घेईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मनपा कामगार कर्मचारी सेना अध्यक्षपदी अभिनंदन चव्हाण यांची नियुक्ती

मनपा कामगार कर्मचारी सेना अध्यक्षपदी अभिनंदन चव्हाण यांची नियुक्ती भाईंदर: महाराष्ट्र नवनिर्माण…