काशिमीरा पोलीस ठाण्याने घरफोडी प्रकरणाचा वेगाने तपास करून दोन सराईत चोरट्यांना अटक करत तब्बल 15 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 9.30 ते 29 ऑक्टोबरच्या पहाटे 4 वाजेच्या दरम्यान मिरा रोड पूर्व, पेणकरपाडा येथील शिवनेरी चाळीत राहणारे फिर्यादी योगेश जगदीश म्हात्रे यांच्या बंद घरातील कडी–कोयंडा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या घटनेनंतर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. जवळपास 100 ते 125 सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने परीक्षण करण्यात आले तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. तपासात उघडकीस आलेल्या माहितीवरून पोलीस पथकाने नाशिक आणि बीड येथे सापळे रचून जगनसिंग तारासिंग कल्याणी उर्फ पाजी (वय 39) आणि हनुमंत बापुराव तांबे (वय 31) या दोघांना अटक केली. चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही अशाच प्रकारचे अनेक गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.

अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून 13 तोळे 106 मिली ग्रॅम इतके सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली FZ मोटारसायकल तसेच घरफोडीसाठी वापरलेले साहित्य असा एकूण 15 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरातील घरफोडी प्रकरणांना रोख बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अटक केलेले आरोपी

  1. जगनसिंग तारासिंग कल्याणी उर्फ पाजी (वय 39)
    रा. शिवशक्ती चाळ, कोलशेत — अटक : नाशिक शहर

  2. हनुमंत बापुराव तांबे (वय 31)
    रा. ता-पाटोदा, जि. बीड — अटक : पाटोदा, बीड

दोघांनीही चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून यापूर्वीही त्यांच्या नावावर अनेक गुन्हे असल्याचे उघड झाले आहे.


जप्त केलेला मुद्देमाल

  • 13 तोळे 106 मिली ग्रॅम सोने (किंमत अंदाजे ₹14,56,000/-)

  • FZ मोटारसायकल (किंमत ₹70,000/-)

  • घरफोडीसाठी वापरलेले साहित्य

एकूण मुद्देमाल : ₹15,26,000/-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…