सत्य परिचित – भाईंदर (इरफान सय्यद), २६ नोव्हेंबर : मिरा रोडमधील हटकेश रोडलगतच्या IDL होम्स परिसरातील अवैध बांधकामांचा मुद्दा पुन्हा उफाळून आला असून, प्रभाग क्र. ४ च्या मनपा प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विशेषत: सहाय्यक आयुक्त व प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांनी अनधिकृत बांधकामांवर वेळेवर कारवाई न केल्याचा आरोप नागरिकांकडून जोरात केला जात आहे.

IDL होम्स : बंगला क्रमांक ९ व १० वर कारवाईचा अभाव

मिरा रोड येथील हटकेश रोडवर असलेल्या IDL होम्स परिसरातील अवैध बांधकामांचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी याठिकाणी अवैध रित्या झालेल्या बांधकामावर तब्बल २ ते ३ महिन्यानंतर कारवाई झाली. सदर बांधकाम दिल्लीतील एका सरकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या मा. अधिकारी असल्यामुळे कारवाई करता येत नाही अशी चर्चा सुरु होत्या. त्यामुळे या बांधकामावर कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात आली मात्र प्रसार माध्यमात बातम्या झळकल्या नंतर व तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी स्वत: स्थळ पाहणी केल्यानंतरच कारवाई करण्यात आली होती. मात्र याच अनधिकृत बांधकामालगत परिसरात IDL होम्स परिसरात परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या बहुमजली संरचनांनी नियमांच्या उल्लेखनाचे चित्र स्पष्ट होत असून प्रभाग ४ च्या मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न निर्माण होत आहेत.

IDL होम्स परिसरात परवानगीशिवाय तिसऱ्या मजल्यापर्यंत उभारण्यात आलेल्या बांधकामांबाबत अनेक तक्रारी असूनही, या ठिकाणी अद्याप कारवाई न झाल्याने “प्रशासन दुहेरी निकष लावत आहे का?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही ठिकाणी तातडीने कारवाई केली जाते, तर IDL होम्समधील बांधकामांवर मात्र कारवाई लांबणीवर टाकल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

तक्रारीनंतरही महिनोंमहिने विलंब — प्रशासकीय निष्क्रियतेची चर्चा

नया नगर, नरेंद्र पाक चौक येथील मे २०२५ पासून सुरू असलेल्या एका अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार देऊनही जवळपास दोन महिने दिरंगाई, त्यानंतर सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यावरच १७ जुलै रोजी नोटीस, आणि नोटीस संपल्यानंतरही कारवाई न झाल्यानंतर माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतरच २१ सप्टेंबरला कारवाई, अशी संपूर्ण प्रक्रिया नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे.

स्थानिकांचा आरोप आहे की,
“बांधकाम तयार होईपर्यंत कागदी घोडे नाचवून कारवाई टाळली जाते.”

महापालिकेकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस — तरीही अवैध बांधकामे सुरूच

अशाच कारवाईतील सातत्यपूर्ण विलंबामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिकेने सहाय्यक आयुक्त स्वप्नील सावंत यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

भाईंदर पूर्व इंडस्ट्रियल इस्टेटमधील

  • रो हाउस क्रमांक ९ व १०

  • आगरी भवन जवळील वाढीव बांधकाम

यांवर योग्यवेळी कारवाई न करणे आणि तक्रारदारास माहिती वेळेत न देणे हे नोटीसचे प्रमुख कारण आहे.

उपायुक्त (मुख्यालय) कल्पिता पिपळे यांनी नमूद केले आहे की कार्यालयीन शिस्त भंग झाली आहे आणि अधिकारी म्हणून आवश्यक तत्परता दिसून आलेली नाही.

परंतु नोटीस बजावूनही प्रभाग ४ मध्ये नव्या अवैध बांधकामांना वेग आला असल्याचे चित्र समोर येत आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.

नागरिकांत वाढता संशय — ‘प्रभाग अधिकारी बांधकामांना संरक्षण देतात का?’

स्थानिक नागरिक व समाजसेवकांनी असा आरोप केला आहे की
“अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाणीचा संशय निर्माण होतो.”

तसेच,
“मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा (IAS) यांच्या नियुक्तीनंतरही अवैध बांधकामे आटोक्यात आली नसल्यामुळे प्रशासनातील शिस्त आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.”

महानगरपालिकेची प्रतिमा धोक्यात?

प्रभाग ४ मधील सातत्यपूर्ण अवैध बांधकाम, कारवाईतील विलंब आणि नागरिकांच्या आरोपांमुळे महानगरपालिकेची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा शहरभर रंगली आहे.

अखेरीस,

  • प्रलंबित तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाईल का?

  • नोटीसनंतरही प्रभाग अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीत बदल होणार का?

  • आयुक्त कार्यालय आता कडक भूमिका घेणार का?

विनय नगर येथील IDL. होम्समधील बंगला क्रमांक ९ आणि १० ला पुन्हा नोटीस बजावून DPL ची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती प्रभाग क्रमांक ४ च्या अधिकार्यांनी दिली. आता पुन्हा नोटीस व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करण्यासाठी किती महिन्याचा कालावधी लागणार ? या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होणार की स्थगती आदेश घेण्यासाठी वेळ दिला जाणार ? असे प्रश्न उपस्थित होत असून या प्रश्नांची उत्तरे मिळण्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply
You May Also Like

मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली परिवहन खात्याची धुरा; पहिल्याच दिवशी खोपट बस आगाराला भेट

मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली परिवहन खात्याची धुरा; पहिल्याच दिवशी खोपट बस…