सत्य परिचित – नवी मुंबई-पनवेल (प्रतिनिधी) 10 डिसेंबर : पनवेल-कोयनावेल परिसरात Wise Homes च्या महत्त्वाकांक्षी आणि आलिशान ‘Bliss Residency’ या निवासी प्रकल्पाच्या बांधकामाचा शुभारंभ अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला. प्रमुख पाहुण्यांनी फावडे उचलून पारंपरिक पद्धतीने भूमिपूजन करून प्रकल्पाची औपचारिक सुरुवात केली.
या प्रसंगी खासदार भिवंडी लोकसभा मा. श्री. सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे, माजी आमदार श्री. बाळाराम पाटील, तसेच श्री. सुनील पाटील, श्री. अनिल पाटील, श्री. हरेश केनी, श्री. प्रसाद भोईर, श्री. बबन दादा पाटील, श्री. नंदकुमार म्हात्रे आणि प्रकल्पाचे संकल्पक व लंडन प्रशिक्षित आर्किटेक्ट श्री. अतुल म्हात्रे उपस्थित होते.
‘Bliss Residency’ हा प्रकल्प आधुनिक जीवनशैली, स्मार्ट लिव्हिंग आणि प्रीमियम सोयीसुविधांचा उत्कृष्ट संगम ठरणार आहे. अत्याधुनिक नियोजन, भव्य रचना, हिरवाईने नटलेला परिसर आणि भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन उभारण्यात येणारा हा उपक्रम पनवेलच्या रिअल इस्टेट क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करेल, अशी सर्वांची एकमुखी प्रतिक्रिया होती.
हे बातमी पण वाचा 👉🏻 : नवी मुंबईत ‘दादा भाऊ’ यांना राजकारण्यांचे छुपे संरक्षण? पनवेल महापालिका निवडणुकीपूर्वी गुंड सुसाट? – पोलिस मात्र मौन का?
प्रमुख पाहुण्यांनी प्रकल्पाची पाहणी करून समाधान व्यक्त करताना म्हटले,
“Wise Homes ने नेहमीच उत्तम बांधकाम गुणवत्ता आणि ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवला आहे. ‘Bliss Residency’ हा त्या परंपरेचा उत्कृष्ट वारसा पुढे नेणारा प्रकल्प आहे. श्री. अतुल म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा!”
आभार प्रदर्शन करताना प्रकल्पाचे मास्टरमाइंड आर्किटेक्ट श्री. अतुल म्हात्रे म्हणाले,
“हा प्रकल्प आमच्या स्वप्नातील घरांची कल्पना वास्तवात उतरवण्याची संधी देणारा आहे. मान्यवरांचा आशिर्वाद आणि स्थानिक नागरिकांचा विश्वास यामुळेच ‘Bliss Residency’ इतक्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने साकार होत आहे.”
पनवेल–कर्जत पट्ट्यातील सर्वात आकर्षक आणि प्रतिष्ठित निवासी पत्त्यांपैकी एक म्हणून ‘Bliss Residency’ उदयास येईल, यात शंका नाही. Wise Homes च्या या नव्या मैलाच्या दगडासाठी टीमला हार्दिक शुभेच्छा!
1 comment