सत्य परिचित – नवी मुंबई-पनवेल (प्रतिनिधी) 10 डिसेंबर :  पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपताना, तक्का दर्गा ते गोदरेज स्काय गार्डन सोसायटी हा अनेक वर्षे खड्ड्यांनी विद्रूप झालेला मुख्य रस्ता अचानक डांबरीकरणाच्या कामांनी गजबजू लागला आहे. दीर्घकाळ निष्क्रिय राहिलेल्या प्रशासनाने याच वेळी गती घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाव न सांगण्याच्या अटीवर एका रहिवाशाने नाराजी व्यक्त करताना सांगितले,
“हा रस्ता वर्षानुवर्षे खड्ड्यांनी भरलेला होता. तक्रारी करून थकलो पण काहीच बदल झाला नाही. आता निवडणुका जवळ आल्या म्हणून अचानक ‘डांबर’ आठवलंय. हे खरे विकासकाम आहे की केवळ दिखावा – आम्हाला सगळं समजतं.”

ही बातमी पण वाचा 👉 : पनवेल-कोयनावेलमध्ये ‘Bliss Residency’ प्रकल्पाचे भव्य भूमिपूजन

या रस्त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांचे मोठे नुकसान ही रोजचीच समस्या बनली होती. पण तक्रारींवर कोणतीही दखल न घेणारे अधिकारी आता मात्र कामे धडाधड सुरू करताना दिसत आहेत. त्यामुळे हा “निवडणूकपूर्व मेकओव्हर” असल्याची चर्चा परिसरात जोरात सुरू आहे.

दरम्यान, संबंधित विभागाकडून या घाईघाईत सुरू झालेल्या डांबरीकरणाबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही.

निवडणुका डोक्यावर आल्या की रस्त्यांना अचानक मिळणारी ‘विकासाची झळाळी’ ही केवळ तात्कालिक तयारी आहे की खऱ्या अर्थाने नागरिकांच्या सोयीसाठी उचललेले पाऊल—याबाबत पनवेलकरांमध्ये एकीकडे उत्सुकता तर दुसरीकडे तितकाच प्रखर संशयही आहे.

1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

नवी मुंबईत ‘दादा भाऊ’ यांना राजकारण्यांचे छुपे संरक्षण? पनवेल महापालिका निवडणुकीपूर्वी गुंड सुसाट? – पोलिस मात्र मौन का?

सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी) 09 डिसेंबर : पनवेल महापालिका निवडणुका…