सत्य परिचित – भाईंदर  (प्रतिनिधी) 13 डिसेंबर : मिरा–भाईंदरच्या प्रशासकीय इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा सोमवारी, १५ डिसेंबर रोजी जोडला जाणार आहे. नव्याने सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (MH-58) च्या सुसज्ज व आधुनिक इमारतीचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे.

मिरा–भाईंदर शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनसंख्या लक्षात घेता, स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून प्रताप सरनाईक यांनी गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत, अखेर मीरा–भाईंदरसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालयाची स्थापना करण्यात आली.

ही बातमी देखील वाचा : मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला मोठे बळ; आमदार गीता जैन यांच्या खंदे समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

या नव्या कार्यालयामुळे वाहन नोंदणी, परवाने, विविध परिवहनविषयक कामांसाठी नागरिकांना ठाण्याला करावी लागणारी धावपळ, वेळेचा अपव्यय आणि अतिरिक्त खर्च लवकरच इतिहासजमा होणार आहे. परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सरनाईक यांनी या प्रकल्पाला प्राधान्य देत, MH-58 या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या उभारणीचा निर्णय मार्गी लावला.

सुरुवातीला जागेच्या मर्यादेमुळे इमारत उभारणीस अडथळे येत होते. मात्र, महसूल विभागाकडील जमीन परिवहन विभागाकडे हस्तांतरित करून सुमारे १५ कोटी रुपये खर्चून सुसज्ज आणि आधुनिक इमारत उभारण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.

सोमवारी होणाऱ्या भूमिपूजन समारंभामुळे मीरा–भाईंदरच्या नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्त होणार असून, शहराच्या प्रशासकीय विकासाला नवी दिशा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…