सोशल मीडिया हे कंटेंट बनवणाऱ्यांसाठी व त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि जगभरातील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एक गजबजलेले व्यासपीठ बनले आहे. सीमा कनोजिया ही सोशल मीडियावर विचित्रपणे हावभाव करून आपले व्हिडिओज पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सवर डान्स करताना एक व्हिडिओ आपल्या अकाउंट वर पोस्ट केला होता. सीमा कनोजिया मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे प्लॅटफॉर्मवर तिच्या नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ती वादाच्या भोवऱ्यात सापडली. व्हिडिओ बनवताना स्पष्टपणे दिसत आहे की, प्रवाशांची गैरसोय झाली.
या व्हिडिओवरून अनेकांनी आरपीएफ पोलिसांना कारवाई करण्याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार रेल्वे स्थानकांवर रिल्स बनवणे हा दंडनीय अपराध असल्यामुळे रेल्वे पोलिसांकडून या प्रकरणावर कारवाई केली गेली. त्यानंतर सीमा कनोजियाने माफी मागणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. अशा घटना रेल्वे स्थानकांवर होऊ नये व अशा घटनांवर आळा घालण्यासाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे.
सीमा कनोजियाने माफी मागितली
सीमा कनोजिया यांनी तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहीर माफी मागितली. तिने तिच्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केला, तिच्या व्हिडिओमुळे झालेला गुन्हा कबूल केला.
View this post on Instagram
आरपीएफ पोलिसांनी (RPF) यापूर्वी रेल्वे कायद्याच्या कलम 152 आणि 153 अंतर्गत कायदेशीर परिणामांवर जोर देऊन अशा कृतींविरुद्ध चेतावणी दिली होती. या कलमांमध्ये रेल्वे स्थानकांवरील सहप्रवाशांना हानी पोहोचवणाऱ्या किंवा गैरसोय करणाऱ्या कृतींसाठी 10 वर्षांपर्यंतच्या कारावासासह दंडाची रूपरेषा आखण्यात आली आहे.