न्यायालयाच्या शिक्षेनंतर आता आमदारकी ही रद्द ; Sunil Kedar Disqualified from Maharashtra Assembly : नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी सुद्धा रद्द करण्यात आली आहे. बँकेच्या घोटाळा प्रकरणात शुक्रवारी न्यायालयाने काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना ५ वर्षांची शिक्षा व १२.५० लाख रुपये दंड ठोठावला होता. यानंतर आता सुनील केदार यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आली आहे.
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर नागपूर पोलिसांनी न्यायालयाचे आदेश विधिमंडळास पाठवले होते त्यानंतर सुनील केदार यांच्या आमदारकीचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे होता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केदार यांची आमदारकी रद्द करत त्यांना दुसरा धक्का दिला आहे.
ही बातमी वाचा : नागपूरच्या शेतकऱ्यांना 20 वर्षानंतर न्याय; आमदार सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा
राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक किशोर बेले यांनी तपासाचे नेतृत्व केले आणि २२ नोव्हेंबर २००२ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. केदार यांना मुख्य आरोपी करण्यात आले आणि इतर आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक चौधरी यांचा समावेश होता. ,
ज्यावेळी या बँकेत घोटाळा झाला त्यावेळी सुनील केदार हे या बँकेचे अध्यक्ष होते. या प्रकरणात एकूण ९ आरोपींनी विरोध कलम ४०६ विश्वासघात ४०९ शासकीय नोकर आदींद्वारे विश्वासघात ४६८ बनावट दस्तावेज तयार करणे ४७१ बनावट दस्तावेज खरे भाजणीने १२०-ब कट रचने व ३४ समान उद्देश या कलमांतर्गत न्यायालयातर्फे शिक्षा सुनावण्यात आली आहे.