Vasant More WhatsApp Status : वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक (Loksabha ELection 2024) लढायची आहे म्हणून त्यांनी महाविकास आघाडीतून आपल्याला उमेदवारी मिळते का यासाठी भेटीगाठी केल्या होत्या. मात्र आता काँग्रेसकडून लोकसभा उमेदवार जाहीर झाल्याने वसंत मोरे यांनी काल व्हाट्सअप वर ठेवलेल्या स्टेटस चर्चेचा विषय बनला आहे. एकदा ठरलं की ठरलं असं म्हणत वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
“मी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहे. कोणत्याही परिस्थितीत मी निवडणुकीच्या रिंगणात असेनच” असं वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. गेला काही दिवसात वसंत मोरे हे महाविकास आघाडी कडून लढणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. मात्र आता त्या चर्चांना पूर्णविराम लागला असून वसंत मोरे अपक्ष लढणार आहे.
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. “लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच मी पक्षासोबत फारकत घेतलीये. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणारच! निवडणूक न लढविल्यास ज्या लोकांनी माझ्यासाठी पक्षाच्या पदाचे राजीनामे दिले आहेत, त्यांचा हा अपमान असेल.”, असं वसंत मोरे म्हणाले होते.
“वसंत मोरे आहे तोपर्यंत पुण्यातील निवडणूक एकतर्फी होणार नाही. मी ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहे. कोणी-कोणी माझ्या वाटेत काटे टाकले ते सगळे काटे मी योग्य वेळ आल्यावर बाहेर काढणार. मी पक्ष निवडणूक लढण्यावर ठाम आहे.”, असा निर्धारच वसंत मोरे यांनी केला आहे.
कोरोना काळात वसंत मोरे ह्यांनी पुण्यातील लोकांना खूप मदत केली होती आणि पुण्याच्या नागरिकां मध्ये वसंत मोरे यांचे नाव चर्चेत आहे. यावरून लोकं मला मतदान करतील या विश्वासाने वसंत मोरे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.