मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत काशिमिरा ७ एकर परिसरात अनधिकृत बांधकामांचा बाजार; बिनदिक्कतपणे काशिमिरा परिसरात अनधिकृत बांधकामे प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांच्या संरक्षणात तयार झालेत?
भाईंदर, दि. ०४ जुलै, (प्रतिनिधी : सुरेश नायर) पुणे अपघात प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मीरा-भाईंदर, ठाणे, कल्याण मुंबई भागात तोडक कारवाईचे आदेश दिले. ठाणे आणि मीरा-भाईंदर शहरातील अनधिकृत पान टपरी, बार आणि पबवर गुरुवारी सकाळपासून ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील विविध भागांत कारवाई सुरू झाली. मात्र काश्मीरा परिसरातील सात एकर परिसरात अनधिकृत बांधकामे काही थांबेना!
काश्मीरा परिसरातील सात एकर परिसरात काही महिन्यांपूर्वी काही राजकीय नेत्यांकडून या भागात वीजपुरवठा सुरू दिल्याने येथील अनधिकृत बांधकामांना वेग आला आहे. सर्वप्रथम कच्च्या स्वरूपाचे पत्राचे रूम बनवले जातात व त्याचे रूपांतर सिमेंट व विटांचे स्वरूप दिले जातात.
हे ही वाचा :३२७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; अंडरवर्ल्डचा सहभाग, दाऊद इब्राहिमचा हस्तक मुख्य सूत्रधार;
संबंधित विभागाचे प्रभाग कार्यालयातील बीट निरीक्षक हे काही बांधकामांचे अहवाल पालिकेत सादर करतात तर काही बांधकामांचे अहवाल सादर करीत नसल्यामुळे या अनधिकृत बांधकामांवर सहसा कारवाई केली जात नाही.
मिळालेल्या माहितीनुसार सात एकर परिसरात राजू व हंसू नावाच्या व्यक्तींनी अनेक चाळी उभारले असून मोठ्या प्रमाणात हा परिसर अनधिकृत बांधकामांचा माहेर घर झाले आहे. याकडे महापालिका अधिकारी व अभियंता यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्तींची दिवाळी साजरी होत आहे. या परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे होत असून महापालिका अधिकारी व कंत्राटी कनिष्ठ अभियंता या विभागाकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या अनधिकृत बांधकामाला संरक्षण दिले जात आहे. मात्र या अनाधिकृत बांधकामावर कारवाई कधी होणार? असा सवाल स्थानिक राजकीय नेते व समाजसेवक विचारत आहे ? मात्र या सर्वांवर मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर व उपायुक्त रवी पवार या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणार की कारवाई करणार ?