भाईंदरमध्ये आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला,अंगावर गरम पाणी फेकलं
सहाय्यक पोलीस निरीक्षकासह 5 पोलीस कर्मचारी भाजले
मिरा भाईंदर, दि. २५ जुलै, (प्रतिनिधी : निरंजन नवले) : भाईंदर पश्चिम येथील वालचंद नगर परिसरात एका गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींनी पोलिसांना विरोध केला आणि चक्क त्यांच्या अंगावर गरम पाणी फेकलं आहे. दिनांक ३१ जुलै २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलीये, या हल्ल्यात एक पोलीस अधिकारी 5 पोलीस कर्मचाऱ्यांचा जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
त्यावेळया पोलीस घराबाहेर जावून आरोपींना दरवाजा उघडण्याचं सांगून, ते दरवाजा न उघडल्याने पोलीस आपल्या वरिष्ठांकडे फोन द्वारे त्यांचा अरेरावी पणा बद्दल तक्रार करतानाचा विडिओ समोर आला आहे.
भाईंदर पश्चिम येथे गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या सहा पोलिसांवर आरोपीनी चक्क अंगावर गरम पाणी फेकल्याने सर्व पोलीस कर्मचारी भाजले आहेत. सध्या त्यांच्यावर भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणात एकूण 4 आरोपी असून त्यापैकी अजय चौपे, अभय चौथे, आणि एक महिला अशा तीन जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता गायकवाड, किरण पचार, दीपक इथापे, सलमान पटवे, रवींद्र वाथ, विजय सोनी, अमृता माची हे जखमी झाले आहेत.