Chhatrapati Shivaji Maharaj Temple
Chhatrapati Shivaji Maharaj Temple in Bhiwandi
छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी दीड एकर जागेत साकारत आहेत. शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थे (Shivkranti Pratishthan Sanstha) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा संकल्प केला गेला

भिवंडी दि. १७ डिसेंबर : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे मंदिर (Chhatrapati Shivaji Maharaj Temple) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील वाडा रस्त्यावरील निसर्गरम्य अशा मराडे पाडा या ठिकाणी दीड एकर जागेत साकारण्यात येत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर असणार आहे.  प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात, मिरवणूक काढतात. परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पुरताच मर्यादित न राहता शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे (Shivkranti Pratishthan Sanstha) छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा संकल्प केला गेला.

मुघलशाही काळात भिवंडी हे एक मोठं व्यापार केंद्र होतं अनेक ठिकाणची लोकं येऊन भिवंडी व्यवसाय करत होते पण इथली लोकं मुगलशाहीला कंटाळली होती त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुघलांचा पराभव करत भिवंडी शहर काबीज केले.

भिवंडीतील मराठी पाडा या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर (Chhatrapati Shivaji Maharaj Temple) तयार होत असून 28 मार्च 2024 रोजी तिथीनुसार साजरा होणाऱ्या शिवजयंती दिनी मंदिराच्या लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी दिली.

गेल्या तीन वर्षांपासून या भव्य मंदिराचे काम सुरू असून शिवराज्याभिषेक कावेरी शिवाजी महाराज सिंहासनावर बसले होते अशा स्वरूपाची मूर्ती या मंदिरात विराजमान होणार आहे. मराठी पाडा येथे एक एकर जागेत हे मंदिर बांधण्यात येत आहे. मंदिराभोवती किल्ल्यांना ज्या प्रकारे तटबंदी असते त्याच प्रकारची तटबंदी बांधण्याचा प्रयत्न शिवक्रांती प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर तयार झाल्यानंतर हे मंदिर सर्वांसाठी शक्तीपीठ असणार आहे आणि या ठिकाणी आणखी ऊर्जा तरुणांना मिळणार आहे यासाठी सर्व शिवभक्त मंदिर पूर्ण होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मीरा भाईंदर मध्ये प्रदूषण करणारे मेसर्स काँक्रीटटेक RMC Plant बंद करण्याचे आदेश.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) ठाणे प्रादेशिक विभागाने मीरा-भाईंदरमधील आरएमसी प्लांटवर कारवाई…