भाईंदर, दि. १० जुलै: मुंबई लोकलमुळे (Mumbai Local Train) दररोज रेल्वे रुळावर चालताना, रेल्वेतून पडून, रेल्वे समोर येऊन आत्महत्या करणे यामुळे अनेक जणांचा मृत्यू होतो. काल वेस्टर्न रेल्वे लाईन वर भाईंदर स्टेशनला एका व्यक्तीने आपल्या मुलासह ट्रेनच्या समोर झोपून आत्महत्या केली.
(A man committed suicide by sleeping in front of the train along with his son at Bhayander Station) भाईंदरमध्ये एका व्यक्तीने आपल्या मुलासह एकमेकांचा हात धरून आत्महत्या केली. याबाबतचा CCTV फुटेज सध्या सोशल मिडीयावर वायरल होत आहे. हे दोघेही आत्महत्या करण्यासाठी भाईंदर रेल्वे स्टेशनवर (Bhaindar Railway Station) आले होते. हे दोघेही आत्महत्या करण्याच्या विचारानेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्याचे या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हे दोघेही प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून चालत विरारच्या दिशेला प्लॅटफॉर्मच्या शेवटी जाऊन दोघेही खाली उतरून रुळ ओलांडतात व प्लॅटफॉर्म क्रमांक 6 च्या रुळावर येऊन समोरून येणाऱ्या लोकल ट्रेन समोर झोपतात. विरार कडून चर्चगेटला (Virar to Churchgate) जाणाऱ्या ट्रेन खाली या दोघांनी आत्महत्या (Bhaindar Railway Station Suicide) केली. या घटनांनंतर रेल्वे पोलीस सदर प्रकरणाची चौकशी करत असून हे दोघेही वसई येथील राहणारे असल्याचे बोलले जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हे दोघेही प्लॅटफॉर्म क्रमांक ५ च्या खाली उतरण्या अगोदर दोघेही सोबत एकमेकांशी बोलत जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवार दिनांक १० जुलै २०२४ रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास भाईंदर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 च्या रुळावर ही घटना घडली. रेल्वे पोलीस या प्रकरणावर पुढील तपास करत आहेत. आत्महत्या करण्यामागे नेमक काय कारण आहे ? याचा रेल्वे पोलीस तपास घेत असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.