चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला एका वर्षानंतर अटक
नालासोपारा, दि. ६ डिसेंबर २०२४: एका वर्षांपूर्वी चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी इरफान तुफैल शेख याला अखेर मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन महिने सातत्याने मेहनत घेतली. एक वर्षांपासून या आरोपीचा शोध सुरू होता अखेर या आरोपीला गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाला आहे.
घटनेचा तपशील:
२१ डिसेंबर २०२३ रोजी नालासोपारा पूर्व येथील साई रोहिणी सोसायटीजवळ फिर्यादी अंकित मिश्रा यांना आरोपी अबू शेख आणि इरफान यांनी भांडणाच्या वादातून चाकूने पोट आणि पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०७, ३२३, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु आरोपी फरार होते.
हेही वाचा: नवघर पोलिसांकडून चोराला अवघ्या दीड तासात जेरबंद
शोधमोहीम आणि अटक:
मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी आरोपीचा मागोवा घेण्यासाठी तपास पथक नेमले. इरफानचा पत्ता शोधण्यासाठी पोलिसांनी दोन महिने सलग प्रयत्न केले. अखेर इरफान नालासोपारा पूर्वेच्या सनशाईन सर्कल येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे सापळा रचून ५ डिसेंबर २०२४ रोजी त्याला अटक केली.
पोलिसांचे कौतुकास्पद कार्य:
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त श्री. मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले.
[…] […]