सत्य परिचित – मिरारोड (प्रतिनिधी) 14 डिसेंबर : मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेला आज मोठे बळ मिळाले आहे. मा. आमदार गीता जैन यांच्या खंद्या समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यात माजी नगरसेविका नयना वसानी, नारायण नंबियार, मिलन भट, प्रमोद दर्जी, संतोष शेट्टी, विजय इंजिनिअर आणि परवाना कुरेशी यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

हा पक्षप्रवेश सोहळा गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात पार पडला. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक हे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत नव्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले.

प्रवेश सोहळ्यात बोलताना प्रताप सरनाईक यांनी, “मिरा-भाईंदरच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून, स्थानिक पातळीवर जनतेशी नाळ जोडून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत आहे,” असे सांगितले.

 

या पक्षप्रवेशामुळे मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असून, आगामी निवडणुकीत याचा मोठा परिणाम दिसून येईल, असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थेतर्फे भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य मंदिर

छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले भव्यदिव्य मंदिर, भिवंडीतील मराडे पाडा या ठिकाणी…