सत्य परिचित – भाईंदर (प्रतिनिधी) 13 डिसेंबर : मिरा–भाईंदरच्या प्रशासकीय इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा सोमवारी, १५ डिसेंबर रोजी जोडला जाणार आहे. नव्याने सुरू झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (MH-58) च्या सुसज्ज व आधुनिक इमारतीचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या शुभहस्ते होणार आहे.