मिरा रोड : मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील घोडबंदर गाव येथील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र काही महिन्यातच बंद पडले होते. याकडे मिरा भाईंदर महानगरपालिका कडून दुर्लक्ष करण्यात आले होते. या केंद्रामुळे घोडबंदर गावातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळत होत्या.
गावकऱ्यांची मागणी होती की, महापालिकेने हे आरोग्यवर्धिनी केंद्र पुन्हा सुरू करावे, जेणेकरून नागरिकांना पुन्हा मोफत आरोग्य उपचार मिळवता येतील. घोडबंदर गावात सुरू करण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचा अचानक बंद झाल्यानंतर घोडबंदर गावातील रहिवाश्यांमध्ये नाराजी पसरली होती. आरोग्यवर्धिनी केंद्र बंद झाल्यानंतर, नागरिकांना मोफत आरोग्य उपचार मिळवण्याची सुविधा बंद झाली होती.
याबाबत सत्य परिचितच्या माध्यमातून वृत्त प्रकाशित केल्यानंतर मिरा भाईंदर महानगरपलिकेला खडबडून जाग आली व मिरा भाईंदर महानगरपालिके तर्फे आरोग्यवर्धिनी केंद्र पुन्हा सुरु करण्यात आले. महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत, केंद्राचे पुनरुज्जीवन केले आणि नागरिकांना पुन्हा मोफत आरोग्य सेवा मिळवण्याची संधी दिली आहे.
सध्या, केंद्रातील स्वच्छता आणि सुविधांची पाहणी केली जात आहे, तसेच जिमखान्याच्या साफसफाईवर देखील लक्ष दिले जात आहे. गावकऱ्यांनी महापालिकेचे आभार मानले असून, त्यांना याबाबत मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच आरोग्य विषयक सुविधा मिळणार असून यापुढे महानगरपालिके कडून आरोग्यवर्धिनी केंद्राकडे दुर्लक्ष होणार नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
घोडबंदर गावातील नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु होऊन बंद होते यासाठी महापालिकाच जबाबदार आहे. कारण मिरा भाईंदर महापालिकेने आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करण्यापूर्वीच सर्व व्यवस्था करणे आवश्यक होते. आरोग्य आणि शाळा या सुविधा शहरातील नागरिकांसाठी कधीच बंद नाही झाल्या पाहिजेत. घोडबंदर गावातील आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु झाल्यानंतर ते सुरळीत सुरु आहे की नाही, याच्याकडे महापालिकेचे लक्ष असायला हवे होते.
– रोहित सुवर्णा, मा. नगरसेवक व ज्येष्ठ समाजसेवक