Jasprit Bumrah & Smriti Mandhana ICC Player of the Month

मुंबई, दि. १० जुलै : जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांनी इतिहास रचला आहे. भारतीय क्रिकेटच्या शिरपेचात जसप्रीत बुमराह व स्मृती मानधनामुळे आणखी एक मानाचा तुरा. जूनमधील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे, बुमराह आणि मानधना ही इतिहासातील एकाच देशापासून दूर आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the Month) जिंकणारी पहिली जोडी ठरली आहे.  यावेळी जून २०२४ महिना भारतीय क्रिकेटसाठी (Indian Cricket) महत्वाचा ठरला.  जसप्रीत बुमराहने जून महिन्याच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे पुरस्कार मिळवण्याच्या घोड दोडीत रोहित शर्मा आणि रहमानुल्ला गुरबाज यांना मागे टाकत ह्या पुरस्कारावर आपल नाव कोरलं आहे.

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) प्लेयर ऑफ द मंथचा किताब जिंकणारा दुसरा भारतीय गोलदांज

जसप्रीत बुमराहने याआधी आयसीसी कडून पुरस्कार मिळवला आहे. त्याने यापूर्वी टी-२० विश्वचषकातही प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार मिळवला होता. त्याने यापूर्वी ८.२६ च्या सरासरीने १५ विकेट्स घेतल्या. यावेळी त्याची इकॉनॉमी ४.१७ च्या आसपास होती. त्याने गट टप्प्यातील सामन्यासह सुपर-८ फेरीत शानदार गोलंदाजी केली. यापूर्वी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा किताब भुवनेश्वर कुमारने पटकावला होता. भुवनेश्वर कुमार नंतर बुमराह (Jasprit Bumrah) हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे, ज्याने हा पुरस्कार पटकावला आहे. त्याची जानेवारी 2021 साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. आता या यादीत बुमराहचेही नाव जोडले गेले आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, बुमराहने हा सन्मान स्वीकारल्यानंतर आभार मानले आहे.  बुमराह म्हणाला की,  हे पुरस्कार जिंकून मला खूप आनंद झाला आहे. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.  यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये काही संस्मरणीय आठवडे घालवल्यानंतर माझ्यासाठी हा विशेष सन्मान आहे. एक संघ म्हणून आमच्याकडे खूप चांगल्या आठवणी आहेत. आता वैयक्तिक सन्मान मिळाल्याने मी आनंदी आहे. या आठवणी माझ्या नेहमी स्मरणात राहतील. रोहित भाई आणि रहमानउल्ला गुरबाज यांचेही अभिनंदन करू इच्छितो. शेवटी, मी माझे कुटुंब, माझे सर्व सहकारी आणि प्रशिक्षक तसेच मला ‘वोट’ करणाऱ्या चाहत्यांचे आभार मानू इच्छितो.’

हे ही वाचा : ३२७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त; अंडरवर्ल्डचा सहभाग, दाऊद इब्राहिमचा हस्तक मुख्य सूत्रधार

जून महिन्यात स्मृती मानधनाची उल्लेखनीय कामगिरी

भारतीय पुरुष क्रिकेट संघासह भारतीय महिला क्रिकेट संघाने ही उल्लेखनीय कामगिरी  केली आहे.  भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) सध्या यांची चर्चा जगभरात होत आहे. भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्ध स्मृतीने धडाकेबाज खेळी खेळली असून स्मृती मानधनाने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत २ शतक आणि १ अर्धशतक झळकावले. त्यामुळे जून महिन्याच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ (ICC Player of the Month) पुरस्कार स्मृती मानधनाने आपल्या नावावर केला आहे. मानधनाने इंग्लंडच्या माईया बाउचर आणि श्रीलंकेच्या विस्मी गुणरत्ने यांना पाठी टाकत  ICC प्लेयर ऑफ द मंथ  पुरस्कार जिंकला. स्मृती मानधनाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात ११३ रन तर दुसऱ्या सामन्यात १३६ रन आणि अखेरच्या सामन्यात ९० धावा केल्या. भारतीय महिला क्रिकेट संघाने ३-० ने मालिका जिकली असून दक्षिण आफ्रिकेचा चांगलाच पराभव केला आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments