काशिमीरा, ठाणे (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात काशीगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दिव्या पेलेस लॉजवर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसायात अडकलेल्या 8 मुलींची सुटका केली असून, एक वेटरला अटक करण्यात आली आहे.
ही बातमी देखील वाचा:
मिरा-भाईंदर मेट्रो मार्गिका ९ प्रकल्पात राजकीय संघर्ष – सरनाईक विरुद्ध मेहता राजकीय संघर्ष तीव्र होणार?
मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांचे गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी काशिगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तोगडवाड यांना नीलकमल नाक्या समोर, ढोढिया पेट्रोल पंपाच्या जवळील दिव्या पेलेस लॉजमध्ये बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती दिली व कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी पोलिस पथक, दोन पंच आणि बोगस ग्राहक तयार करून छापा मारण्याची योजना आखली.
सदर पथकाने दिव्या पेलेस लॉजमध्ये बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायाची खात्री केली. त्यानंतर पोलिसांनी लॉजवर छापा टाकला. या कारवाईत एक वेटरला अटक करण्यात आली असून, 8 मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.
दिव्या पेलेस लॉजचे चालक, मालक, व्यवस्थापक आणि वेटर यांच्याविरुद्ध काशीगांव पोलिस ठाण्यात BNS कलम 143(3), 3(5) सह पीटा अॅक्ट 3, 4, 5, 6 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या लॉजचा चालक, मालक आणि व्यवस्थापक फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
सदर प्रकरणात काशीगांव पोलिस अधिक तपास करत असून फरार आरोपींच्या अटकेसाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. या कारवाईने परिसरातील अवैध वेश्या व्यवसायावर मोठा आघात बसला
आहे.