Mahanand Badge honored with Samajbhushan Award
Mahanand Badge honored with Samajbhushan Award

भाईंदर ( प्रतिनिधी): सोशल एज्युकेशन मुव्हमेंट, शाखा ठाणे यांच्या वतीने मिरा भाईंदर बुद्धिस्ट पीपल्स फाऊंडेशनचे अध्यक्ष व धम्म सम्राट अशोक बुद्ध विहार व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष आयु. महानंद बडगे साहेब यांना त्यांच्या धम्मकार्यातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल “समाजभूषण २०२४” पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र, बूके, शॉल व सोशल एज्युकेशन मुव्हमेंटचे मुखपत्र असलेले “अवेक इंडिया” मासिक असे पुरस्काराचे स्वरुप असलेला पुरस्कार स्वीकारताना अत्यानंद व्यक्त करतानाच यामुळे जबाबदारी अधिक वाढल्याची भावना बडगे यांनी बोलून दाखवली . मिरा भाईंदर मध्ये विविध उपक्रम राबवून धम्म चळवळ गतिमान करण्यात महानंद बडगे यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मीरा भाईंदर मध्ये प्रदूषण करणारे मेसर्स काँक्रीटटेक RMC Plant बंद करण्याचे आदेश.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) ठाणे प्रादेशिक विभागाने मीरा-भाईंदरमधील आरएमसी प्लांटवर कारवाई…