मुंबई Mumbai, दि. १३ जुलै, (प्रतिनिधी): Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result : महायुतीने मैदान मारलं आहे. महाराष्ट्रातील सध्या स्थितीत सर्वात महत्त्वाची मानली जाणारी विधान परिषदेची निवडणूक (Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result) आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले असून या निवडणुकीत महायुतीने मैदान जिंकले आहे. महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव करत महायुतीचे ९ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विधान परिषदेच्या मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी महायुतीची हालचाल सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्येच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे कारण विधानसभा निवडणुकी आधीचा हा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे.
विधान परिषदेच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली सुरू
महाराष्ट्रात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक आयोजित होण्याच्या शक्यता आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकी अगोदर आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याअगोदरच विधान परिषदेच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो. विधान परिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result) महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. संवाद साधत असताना त्यांच्या एका बाजूला पंकजा मुंडे तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे होते.
निवडणुकीतली लढत अटीतटीची ठरली
महायुतीच्या निवडून आलेल्या उमेदवारांपैकी भाजपचे ५ आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाचे २ उमेदवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेना पक्षाचे २ उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे तीन पैकी दोनच उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीत एकूण 274 आमदारांनी मतदान केलं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीची गेल्या तीन दिवसांपासून मोठी तयारी सुरू होती. सर्व पक्षांनी आपापल्या उमेदवार व आमदारांना मुंबईच्या वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले होते. मात्र महायुतीने ८ ऐवजी ९ उमेदवार दिल्याने या निवडणुकीतली लढत अटीतटीची ठरली. या निवडणुकीपूर्वी महायुतीचे आठ उमेदवार सहज जिंकून येणार असल्याचे पाहायला मिळत होते मात्र महायुतीने ९ वा उमेदवार दिल्याने महाविकास आघाडीला निवडणुकीत धक्का मिळाला.
कोणाला किती मतं पडली?
भाजपचे विजयी उमेदवार –
1) पंकजा मुंडे – 26 मतं
2) परिणय फुके – 23 मतं
3) सदाभाऊ खोत – 26 मतं
4) अमित गोरखे – 23 मतं
5) योगेश टिळेकर – 23 मतं
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विजयी उमेदवार
1) शिवाजीराव गर्जे – 23 मतं
2) राजेश विटेकर – 24 मतं
शिवसेना विजयी उमेदवार
1) कृपाल तुमाने – 25 मतं
2) भावना गवळी – 24 मतं
काँग्रेसच्या विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव – 25 मतं
शिवसेना ठाकरे गट (विजयी घोषित होणं बाकी)
1) मिलिंद नार्वेकर – 22 मतं
शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार (निकाल येणं बाकी)
1) जयंत पाटील (शेकाप) – 12 मतं
[…] […]