Marathi News : दिवसाढवळ्या मुंबईतील चुनाभट्टी परिसरात पप्पू येरुणकरची गोळ्या झाडून हत्यामहिनाभरापूर्वी सुमित उर्फ पप्पू येरुणकर (४६) पॅरोलवर बाहेर आला होता. बांधकामाच्या कंत्राटासाठी पप्पू येरुणकरचे जुने पार्टनर सनी पाटील आणि सागर यांनी केल्याचे बोलले जाते. चुनाभट्टीत दिवसाढवळ्या झालेल्या या हल्यात ८ वर्षांच्या एका मुलीसह ५ जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Marathi News दिवसाढवळ्या मुंबईतील चुनाभट्टी परिसरात पप्पू येरुणकरची गोळ्या झाडून हत्या
मुंबई (Mumbai News) : जुन्या वैमनस्यातून चुनाभट्टी परिसरात गोळीबार, ३ जखमी, एकाचा मृत्यू. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. १६ हून अधिक राऊंड गोळीबार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वैमनस्यातून गोळीबार सुरू असून त्यात ४ जणांना गोळ्या लागल्या आहेत.
Marathi News दिवसाढवळ्या मुंबईतील चुनाभट्टी परिसरात पप्पू येरुणकरची गोळ्या झाडून हत्या : मुंबईतील चुनाभट्टी (Chunnabhatti News, Mumbai) परिसर रविवारी गोळ्यांच्या आवाजाने गुंजला. चुनाभट्टी परिसरात झालेल्या गोळीबारात १६ हून अधिक राउंड गोळीबार करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून हा गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये ४ जणांना गोळ्या लागल्या असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सर्व जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुपारी ३.३० च्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुमित उर्फ पप्पू येरुणकर असे मृताचे नाव आहे.
चुनाभट्टी येथील आझाद गल्ली मध्ये दुपारी सव्वातीनच्या सुमारास ही घटना घडली. हल्लेखोर येरुणकरची हत्या करण्यासाठी दुचाकीवरुन आले आणि त्यांनी येरुणकरच्या दिशेने १६ हून अधिक राउंड गोळीबार केला.
काही काळापूर्वी तो तुरुंगातून बाहेर आला असून त्याच्यावर अनेक गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची माहिती आहे. मुंबई क्राइम ब्रँचही अनेक पैलूंवरून या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चुनाभट्टी परिसरात दुपारी ३.१५ च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली, ज्यामध्ये सुमित येरुणकर नावाच्या व्यक्तीचा गोळीबार झाला आणि अन्य ४ जण जखमी झाले.
या घटनेतील आरोपींची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. गोळीबारात पप्पू एरुणकर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.