मुंबई दि. १६ डिसेंबर : धारावी पुर्नरविकास प्रकल्पाविरोधात अदानी (Adani ) उद्योग समूहाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला . धारावी वाचवा असा नारा देत प्रचंड मोठा मोर्चा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित काढण्यात आला. स्वत: उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. धारावी ते बीकेसी दरम्यान आज भगवं तुफान अवतरलं होतं. सर्व कार्यकर्त्यांच्या हातात भगवे झेंडे होते. या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहे. धारावी टी जंक्शनपासून उद्धव ठाकरे पायी चालत बीकेसीपर्यंत आले. अदानी (Adani ) उद्योग समूहाला देण्यात आलेल्या धारावी प्रकल्पात त्रुटी असल्याने या प्रकल्पाला उद्धव ठाकरे यांच्या तर्फे विरोध करण्यात येत आहे.
धारावी ते बीकेसी काढलेल्या मोर्चानंतर ठाकरेंनी सभा घेत सदर प्रकल्पा विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली. सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, “घराला घर दिल्याशिवाय धारावीकरांच्या केसाला देखील धक्का लागता कामा नये. जिथल्या तिथं घर पात्र अपात्र आम्ही मानत नाही. व्यवसायाला देखील जागा दिली पाहिजे. कोळीवाड्याची, कुंभारवाड्यांचंही सीमांत करा. इथं पापड-लोणच्याचे व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायाला आवश्यक असलेली जागाही दिलीच पाहिजे त्याशिवाय इथून हालायचचं नाही.” त्यावरुन, भाजपा नेत्यांनी शिवसेना (उबाठा) आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अदानी समूहाचा खुलासा “धारावी प्रकल्पाच्या अटी ‘मविआ’च्या काळातील”
“धारावीला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केलं आहे आणि ३०० स्क्वेअर फूट जागा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र पुनर्विकास करत असताना धारावीकरांना ४०० ते ५०० स्क्वेअर फूट एवढी जागा मिळायला हवी. धारावीमध्ये धारावीकरांना घर मिळालीच पाहिजेत, पण सोबतच गिरणी कामगार, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांनाही तिथं घरं देण्यात यावीत. टीडीआरबाबतही गोंधळ आहे. इतर विकासकांनाही टीडीआर घ्यायचा असेल तर ४० टक्क्यांची अट टाकत तो टीडीआर अदानींकडूनच विकत घ्यायला लागेल. मात्र यासाठी एक वेगळी कंपनी स्थापन करायला हवी. जसा बीडीडी चाळींचा विकास म्हाडाकडून केला जातो, तसा धारावीचा विकास सरकारने करावा. टीडीआर सरकारकडून विकत घेतला गेला पाहिजे,” असही उद्धव ठाकरे म्हणाले.
खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोर्चावर टीका
“मुंबईतल्या बांधकाम व्यवसायिकांची सुपारी घेऊन उद्धव ठाकरेंचा आजचा धारावीतला मोर्चा आहे. स्वतःच्या आर्थिक हितासाठी उद्धव ठाकरेंचा हा मोर्चा असून टीडीआरबद्दल उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप खोटे आहेत. ते स्वतः अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हा धारावीबद्दल काही का केलं नाही?” असा खोचक सवालही शेवाळे यांनी विचारला आहे.
तसंच “मुंबई विमानतळ अदानी (Adani ) चालवतात, मातोश्रीमध्ये वीजही आदानी यांची आहे. मग ही वीज वापरणार नाही का? मुंबई विमानतळावरून उद्धव ठाकरे जाणार नाहीत का?” अशा शब्दांत राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
[…] […]