सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी) 19 January :  नवी मुंबई पोलीस दलाला हादरवणारी आणि खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराचा लेडीज बारमधील संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाची मोठी नामुष्की झाली आहे.

कोपरखैरणे येथील नटराज लेडीज बारमध्ये मद्यप्राशन करत नृत्य करणाऱ्या महिलांवर पैसे उडवत असल्याचा व्हिडीओ पोलीस हवालदार अनिल सुखदेव मांडोळे (पोहवा/१३२) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे, अनैतिक कृत्यांवर आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या कक्षात कार्यरत असलेला पोलीसच अशा प्रकारात सहभागी असल्याने सर्व स्तरांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत मांडोळे यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) सचिन बाबासाहेब गुंजाळ यांनी ९ जानेवारी २०२६ रोजी निलंबनाचे आदेश जारी केले. शिस्तप्रिय पोलीस सेवेच्या प्रतिमेला तडा जाईल असे वर्तन केल्याचा ठपका आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस महासंचालक (DGP) सदानंद दाते यांनी नवी मुंबईला गोपनीय भेट दिल्याची माहिती समोर आली असून, पोलीस प्रशासनातील हालचालींना वेग आला आहे. वरिष्ठ स्तरावरून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.

या घटनेमुळे पोलीस दलाची शिस्त, नैतिकता आणि विश्वासार्हता यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

1 comment
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

वर्षानुवर्षे खड्डे, पण निवडणुकीच्या आधीच ‘विकासाची’ लगबग व ‘डांबरी मेकओव्हर’—पनवेलमध्ये नागरिकांचा सवाल

सत्य परिचित – नवी मुंबई-पनवेल (प्रतिनिधी) 10 डिसेंबर :  पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका…