मीरा-भाईंदरमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभेपूर्वी अपक्ष आमदार गीता जैन यांच्या विधानांवर नरेंद्र मेहता यांची टीका
भाईंदर (प्रतिनिधी) : मीरा रोड येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभेच्या वेळेत बदल. संध्याकाळी ६ ऐवजी ४.३० वाजता होणारं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या मीरा रोड येथे भाजपा उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या समर्थनार्थ प्रचार सभा घेणार आहेत. ही सभा पूर्वनियोजित वेळेनुसार संध्याकाळी सहा वाजता एस. के. स्टोन जवळ आयोजित केली जाणार होती. मात्र, सभेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आता ही सभा संध्याकाळी नियोजित वेळेच्या दीड तास अगोदर म्हणजेच साडेचार वाजता होईल.
मीरा-भाईंदर शहरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांच्या प्रचारासाठी येणार आहेत. मिरा भाईंदर शहरात योगी आदित्यनाथ येणार असल्याबाबत चर्चेचा विषय ठरलेला आहे. आज सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे अपक्ष आमदार गीता जैन यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. त्यांनी श्रीराम मंदिर उभारणीसाठी योगी आदित्यनाथ यांच्या योगदान असल्याची स्तुती केली असून, शहरात त्यांच उद्या होणार आगमन हिंदू बांधवांसाठी गौरवाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.
या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांनी गीता जैन यांच्यावर जोरदार टीका केली. मेहता यांनी आरोप केला की, गीता जैन या मतांसाठी योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा वापर करत आहेत आणि शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी म्हटले की, योगी आदित्यनाथ यांची प्रतिमा वापरून गीता जैन नागरिकांमध्ये लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्या विधानांतून चुकीचा संदेश दिला जात आहे.
नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केले की, उद्या योगी आदित्यनाथ जे काही प्रचार सभेत बोलणार आहेत, त्यावरून योगी आदित्यनाथ प्रचारादरम्यान जे काही बोलते ते देखील जैन यांनी मान्य करावे असा टोचक सल्ला मेहता यांनी दिला आहे. गीता जैन यांनी योगी आदित्यनाथ यांचे नाव वापरून मतांचे राजकारण करू नये तसेच शहरातील नागरिकांची त्यांनी आतापर्यंत दिशाभूलच केले असल्याचे मेहता यांचं म्हणणं आहे.