भाईंदर: महाराष्ट्र राज्य विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. महायुतीचे व महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने आपापल्या याद्या जाहीर केल्या आहेत. भाजपची काल दुसरी यादी जाहीर झाली मात्र त्यात मिरा भाईंदर शहराच्या 145 विधानसभा मतदारसंघ असलेल्या जागेवर अद्याप शिका मोर्तब झाला नसून माजी आमदार नरेंद्र मेहता व विद्यमान आमदार गीता जैन यांच्यामध्ये या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. अशातच आज दिनांक 27 ऑक्टोबर रोजी माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून बाईक संकल्प रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. भाईंदरच्या केबिन रोडवर संकल्प बाईक रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे.
“केबिन रोड → जेसल पार्क बॅक रोड → आशीर्वाद अस्पताल → जैन मंदिर → सबवे → भाईंदर पश्चिम स्टेशन → संतोष टॉकीज → बावन जिन्हालय (जैन मंदिर) → आमदार कार्यालय → 60 फीट रोड → जुने रजिस्ट्रेशन ऑफिस → मांडवी तलाव→ मैक्सस मॉल फ्लाईओवर → नया नगर रोड → निहाल कार्नर → TMT बस थांबा→ सेक्टर 5 कार्नर → जैन मंदिर → सरयूमाता चौक → इंदिरा गांधी रूग्णालय → आरएनए कोर्टयार्ड→उमाकांत मिश्रा चौक → बैंक ऑफ़ इंडिया → बालाजी होटल → जांगिड़ सर्कल” या मार्गाद्वारे संकल्प बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या संकल्प बाईक रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते तसेच हजारोच्या उपस्थितीने दुचाकी वर कार्यकर्ते या रॅलीत सामील झाले होते.
भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात मोठा उत्साह दिसून आला. तसेच बाईक रॅलीच्या दरम्यान ही बाईक रॅली नसून निवडणुकीचा प्रचार असल्याचं स्वतः नरेंद्र मेहता यांनी सांगितला आहे. तसेच महायुतीकडून उमेदवारी नरेंद्र मेहता यांनाच मिळणार असल्याचं मेहता समर्थकांचे म्हणणं आहे.