सत्य परिचित – उरण, (प्रतिनिधी) 03 डिसेंबर 2025: उरण तालुक्यातील पगोटे आणि कुंडे परिसरात फर्नेस ऑयल, केमिकल्स आणि इतर पेट्रोलियम पदार्थांचा काळाबाजार अक्षरशः माजला असून पोलीस ठाण्याच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर हा मोठा अवैध रॅकेट बेधडकपणे सुरू आहे. स्थानिकांचा रोष वाढत असून प्रशासनाच्या निष्क्रीय भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

 

स्थानिकांच्या माहितीनुसार, हरीश भोईर, जुम्मन पठाण आणि वसीम हे या टोळीचे प्रमुख सूत्रधार असून रात्रीच्या अंधारात मोठ्या टँकर्समधून तेल उतरवून त्वरित लहान टँकर्स व ड्रम्समध्ये भरून राज्याबाहेर खपवले जाते. हा संपूर्ण व्यवहार इतका बेधडकपणे केला जातो की जणू कायद्यालाच आव्हान दिले जात आहे.

 

सगळ्यात आश्चर्य म्हणजे, शिवसेना कार्यालयासमोरील पार्किंग आणि कुंडे गावातील खड्डा पार्किंगमध्ये हा धंदा दिवसाढवळ्या सुरू असतो. परिसरात दररोज होणारी संशयास्पद हालचाल पाहून नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या, परंतु पोलीस प्रशासन मात्र ‘कानावर हात’ ठेवून बसल्याचे चित्र आहे.

 

या रॅकेटमुळे करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे, पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे आणि कधीही भीषण स्फोट, आग किंवा मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. फर्नेस ऑयल आणि केमिकल्सचा या पद्धतीने केलेला अवैध साठा संपूर्ण परिसरासाठी प्राणघातक ठरू शकतो.

 

स्थानिकांचा सवाल सरळ आणि थेट —

पोलीसांनी कारवाई न करण्यामागे मनुष्यबळाचा प्रश्न आहे का, इच्छाशक्तीचा अभाव आहे का… की मग कोणाचे राजकीय, आर्थिक संरक्षण आहे?

 

उरणकरांना आता फक्त उत्तरं नकोत, कारवाई हवी आहे. पोलीस ठाण्याच्या सावलीत उघड उघड चालणारा हा काळाबाजार थांबवला नाही, तर येणाऱ्या काळात याचे दुष्परिणाम विनाशकारी असतील, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

महाराष्ट्रात 7 महिन्यांत 4872 नवजात बालकांचा मृत्यू; शासनानेच जाहीर केली आकडेवारी.

Shocking! 4,872 newborns died in 7 months in Maharashtra महाराष्ट्रात  7 महिन्यांत…