मिरा भाईदरमध्ये “ट्रिपल इंजिनचं” सरकार येणार असल्याचा पियुष गोयल यांचा दावा
भाईंदर (प्रतिनिधी) : मिरा भाईदर शहरात आज दुपारी ३ वाजता भाजपने भाईदर पश्चिम येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता, शहरातील व्यापारी, उद्योजक, सीए, सीएस आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात पियुष गोयल यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. त्यांनी मिरा भाईदरमध्ये “ट्रिपल इंजिन” सरकार असल्याचं सांगितलं, ज्यामध्ये नगरपालिकेचा, राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा समावेश आहे. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकार्यांचा उल्लेख केला आणि सांगितलं की, ठाकरे सरकारच्या काळात अनेक प्रकल्प थांबले होते, पण महायुती सरकार आल्यानंतर सर्व कामं पुन्हा सुरू झाली आहेत.
गोयल यांनी सांगितलं की, मिरा भाईदरपर्यंत कोस्टल रोड आणण्यासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेतल्या गेल्या आहेत आणि निवडणूक झाल्यावर त्याच्यावर काम सुरू होईल. तसेच, मोदींच्या नेतृत्वाखाली विकास कसा झाला हे सांगितल्यानंतर, नरेंद्र मेहता देखील मिरा भाईदरच्या विकासासाठी सतत प्रयत्न करत आहेत.
भाजपने मेहतांना पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली आहे, आणि गोयल यांनी व्यापारी, उद्योजक आणि सीए-सीएस यांना त्यांना मदत करण्याचे आवाहन केले. शेवटी, त्यांनी सांगितलं की, २०१९ मध्ये गीता जैन अपक्ष निवडून आल्यावर त्यांनी ठाकरे सरकारला पाठिंबा दिला होता, आणि आता मेहता यांना निवडून आणणं हे शहराच्या सर्व लोकांची जबाबदारी आहे.