सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी) 09 डिसेंबर : पनवेल महापालिका निवडणुका अगदी दारात येऊन ठेपल्या असताना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात गंभीर गुन्ह्यांचे आरोपी खुलेआम फिरत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहेत. स्वतःला ‘भाई-दादा’ म्हणवणाऱ्या या व्यक्तींवर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असतानाही कारवाई न होण्यावरून राजकीय संरक्षणाचा संशय व्यक्त केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार ज्या व्यक्तींवर गंभीर प्रकरणे दाखल असल्याचा दावा आहे, त्यात खालील नावांचा उल्लेख केला जातो—
प्रसाद रंगीले उर्फ गोलू, विकास निकम, सनी कैकाडी आणि राजकुमार म्हात्रे.
स्थानिकांच्या मते, या व्यक्तींवर खुनाचा प्रयत्न, खंडणी, हल्ले, धमकी देणे आणि दहशत निर्माण करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे म्हटले जाते. तरीही तडीपारी किंवा अटक कारवाई न होण्यामागे उच्चस्तरीय राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप सातत्याने पुढे येत आहे.
निवडणुका जवळ आल्याने परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. नागरिकांचा दावा आहे की,
“गुंडांच्या आर्थिक आणि स्नायू शक्तीचा उपयोग करून स्थानिक राजकारणात हस्तक्षेप होण्याचा धोका वाढला आहे.”
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारींनंतरही त्वरित राज्यबंदी किंवा अटकेची कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे “नियम एक आणि अंमलबजावणी दुसरी?” असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीरपणे म्हटले होते—
“महाराष्ट्रात गुंडांना जागा नाही.”
मात्र नवी मुंबईतील सध्याच्या परिस्थितीकडे पाहता, ही घोषणा वास्तवात उतरते का? असा प्रश्न आता नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून विचारला जात आहे.
निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना गुंडांवर कठोर कारवाई न झाल्यास पनवेल महापालिकेची निवडणूक ‘दबावाखाली’ होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
नवी मुंबईकरांची मागणी एकच—
“गुन्हेगारांना मिळणारे राजकीय संरक्षण थांबवा; कायदा सर्वांसाठी समान लागू करा.”
2 comments
हेच गुंड पेण नगरपरिषद निवडणूक 2025 च्या वेळी 2 डिसेंबर 2025 रोजी सत्ताधारी पक्षाकडून आणले गेले होते
याचे बरेच वीडियो देखील viral झाले होते