Sharad Pawar NCP Party’s First Candidate List 2024: शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, पाहा कुणाकुणाला संधी मिळाली !!!

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महायुतीमधील घटक पक्षांनी आपल्या याद्या जाहीर केल्यानंतर आज  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार  आहे. तसेच मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे दुसरीकडे  बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून  राष्ट्रवादीचे युवा नेते महेबुब शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

इस्लामपूरमधून जयंत पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील तर काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. घनसावंगीमधून राजेश टोपे रिंगणात असतील.  मुंब्रा कळवा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  उरलेल्या मतदारांची यादी मुंबईत जाऊन जाहीर केली जाईल, असे जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काही जागांवर अद्यापही महाविकास आघाडीतील पक्षांशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांची नावे लवकरच मुंबईत जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली

  1. इस्लामपूर – जयंत पाटील
  2. काटोल –अनिल देशमुख
  3. घनसावंगी – राजेश टोपे
  4. कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
  5. मुंब्रा कळवा –जितेंद्र आव्हाड
  6. कोरेगाव – शशिकांत शिंदे
  7. वसमत – जयप्रकाश दांडेगावकर
  8. जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर
  9. इंदापूर – हर्षवर्धन पाटील
  10. राहुरी – प्राजक्त तनपुरे
  11. शिरूर – अशोक पवार
  12. शिराळा – मानसिंगराव नाईक
  13. विक्रमगड – सुनील भुसारा
  14. कर्जत जामखेड – रोहित पवार
  15. अहमदपूर – विनायकराव पाटील
  16. सिंदखेडराजा – डॉ. राजेंद्र शिंगणे
  17. उदगीर – सुधाकर भालेराव
  18. भोकरदन – चंद्रकांत दानवे
  19. तुमसर – चरण वाघमारे
  20. किनवट – प्रदीप नाईक
  21. जिंतूर – विजय भांबळे
  22. केज – पृथ्वीराज साठे
  23. बेलापूर – संदीप नाईक
  24. वडगाव शेरी – बापूसाहेब पठारे
  25. जामनेर – दिलीप खोडपे
  26. मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
  27. मुर्तिजापूर – सम्राट डोंगरदिवे
  28. नागपूर पूर्व – दुनेश्वर पेठे
  29. तिरोडा – रविकांत बोपचे
  30. अहेरी – भाग्यश्री आत्राम
  31. बदनापूर – रुपकुमार चौधरी
  32. मुरबाड – सुभाष पवार
  33. घाटकोपर पूर्व – राखी जाधव
  34. आंबेगाव – देवदत्त निकम
  35. बारामती – युगेंद्र पवार
  36. कोपरगाव – संदीप वर्पे
  37. शेवगाव – प्रताप ढाकणे
  38. पारनेर – रानी लंके
  39. आष्टी – महेबुब शेख
  40. करमाळा – नारायण पाटील
  41. सोलापूर उत्तर – महेश कोठे
  42. चिपळून – प्रशांत यादव
  43. कागल – समरजीत घाटगे
  44. तासगाव-कवठे महांकाळ – रोहित पाटील
  45. हडपसर – प्रशांत जगताप

 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments

[…] हे देखील वाचा : शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारां… […]

You May Also Like

Opposition MPs Suspended From Lok Sabha लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतील 34 विरोधी खासदारांचेही निलंबन, एकाच दिवसात 67 खासदारांचे निलंबन

राजकीय वर्तुळात सध्या मोठी खळबळ सुरु आहे. लोकसभेनंतर सोमवारी राज्यसभेतूनही 34 विरोधी…

वसंत मोरे लोकसभा निवडणूक आता अपक्ष म्हणून लढत देणार Vasant More WhatsApp Status

Vasant More WhatsApp Status : वसंत मोरे यांना लोकसभा निवडणूक (Loksabha ELection…

ठाण्याची लोकसभेची जागा कोणाच्या नावावर होणार ?

ठाण्याची लोकसभेची जागा कोणाच्या नावावर होणार? एकनाथ शिंदे यांचा शिलेदार की उद्धव…

एग्जिट पोल प्रमाणे 400 पार; सलग तिसऱ्यांदा Narendra Modi प्रधानमंत्री बनणार ?

एग्जिट पोल प्रमाणे 400 पार; सलग तिसऱ्यांदा Narendra Modi प्रधानमंत्री बनणार ?…

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result : महायुतीने मैदान मारलं

मुंबई Mumbai, दि. १३ जुलै, (प्रतिनिधी): Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Result…

मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघाची जागा भाजप कडे असणार की शिवसेना दावा करणार ?

मिरा भाईंदर विधानसभा १४५ मतदारसंघाची जागा भाजप कडे असणार की शिवसेना दावा…