सत्य परिचित – पनवेल (प्रतिनिधी) 02 January : पनवेल महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना शहराच्या मध्यवर्ती परिसरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहेत. शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर संशयास्पद हालचाली वाढल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिक व खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार, या परिसरात काही महिला उघडपणे ग्राहक शोधताना दिसत असून, त्यांना जवळच्या काही लॉजिंगमध्ये नेले जात असल्याचा आरोप केला जात आहे. यामध्ये दत्ता इन, प्रशांत लॉजिंग आणि जय माँ इन स्वराज लॉजिंग या ठिकाणांचा उल्लेख नागरिकांकडून केला जात आहे. मात्र, या बाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न

गजबजलेल्या बाजारपेठ व सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारच्या कथित घटनांमुळे महिला, विद्यार्थी आणि कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. निवडणुकीच्या काळात अशा तक्रारी वाढत असल्याने शहराच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. याआधीही पनवेलमध्ये अशा स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्या होत्या, मात्र ठोस कारवाई न झाल्याचा आरोप आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

निवडणूक आचारसंहिता लागू असताना देखील कथित अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष का होत आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पनवेल पोलीस व महापालिका प्रशासनाने तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षितता अबाधित राहणे अपेक्षित असताना, अशा गंभीर आरोपांमुळे प्रशासनाची कसोटी लागली आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

नवी मुंबईत ‘दादा भाऊ’ यांना राजकारण्यांचे छुपे संरक्षण? पनवेल महापालिका निवडणुकीपूर्वी गुंड सुसाट? – पोलिस मात्र मौन का?

सत्य परिचित – नवी मुंबई (प्रतिनिधी) 09 डिसेंबर : पनवेल महापालिका निवडणुका…