भाईंदर, दि. १२ जुलै, (प्रतिनिधी : निरंजन नवले) मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शौचालय दुरुस्तीच्या कामाची ६ महिन्यांपासून रखडपट्टी सुरु आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिली असली तरी यावेळी मुख्य कार्यालय, भाईंदर पश्चिम येथे असलेल्या सुलभ शौचालयामुळे महापालिका चर्चेत आहे. मुख्य कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आणि चौथ्या मजल्यावरील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून नवीन स्वच्छतागृह बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र गेल्या ६ महिन्यांपासून हे स्वच्छतागृह दुरुस्त होत असून अजूनही अर्धवटच आहे. त्यामुळे शौचालय दुरुस्त करण्यसाठी एवढा वेळ का लागत आहे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महानगरपालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, सहाय्यक आयुक्त नरेंद्र चव्हाण या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. प्रत्येकाला शौचालयात जाण्याची परवानगी नाही आणि हात धुण्याची अडचण असूनही, कोणीही याबद्दल तक्रार करत नाही. अखेर, कारण काय ? महापालिकेच्याच कार्यालयातील स्वच्छतागृह जे ठेकेदाराने दुरुस्त करण्यासाठी घेतले आहे, ते ६ महिने उलटूनही अपूर्ण आहे.
आता याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत असून, चौथ्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहाचीही तीच अवस्था आहे. त्याठिकाणी शहर अभियंता, बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता व सर्व बांधकाम अभियंता यांची कार्यालये असूनही या स्वच्छतागृहाचे काम अपूर्णच आहे. आता कोणत्या शुभ मुहूर्तावर हे स्वच्छतागृह यांची दुरुस्ती होऊन वापरण्यासाठी मोकळे होणार याची अधिकारी देखील वाट पाहत आहे.
हे हि वाचा : मिरा भाईंदर शहरात प्राणी मित्रांकडून भटक्या श्वानांच्या संरक्षणासाठी श्वानांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे
मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य कार्यालय शौचालयाचे उद्घाटन कधी होणार?
नेहमी मिरा-भाईंदर महानगरपालिकेवर कोणतेही काम वेळेवर होत नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र महापालिकेच्या इमारतीतील शौचालय दुरुस्तीचे काम देखील वेळेवर होत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत आम्ही अनेक अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता
बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला. काही लोक शांत स्वरात म्हणाले हे विभागीय काम आहे, लवकरच पूर्ण होईल. असे सांगितले
आता मिरा भाईंदर महानगरपालिका स्वतः च्या मुख्यालयात रखडलेल्या कामाची दखल घेणार का ? हे पाहायचे आहे. महापालिका आयुक्त किती लवकर होणार
शौचालयाचे बांधकाम पूर्ण करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिरा भाईंदर महानगरपालिका मुख्य इमारतीच्या तळ मजल्यावर शौचालयाची दुरवस्था
मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात शहरातील मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे ठिकठिकाणी शौचालय आहे त्यांची नीट देखभाल व दुरुस्ती ठेकेदाराकडून केली जात नाही. याबाबत अनेक तक्रारी महापालिकेत येत असतात. मात्र महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावरील पुरुषांच्या शौचालयाचे दुरावस्था पाहायला मिळत आहे. या शौचालयातील दरवाजांना कुंड्या नसून शौचालयातील पाण्याचे पाईपचे नळ हे तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे तळमजल्यावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे
[…] […]
[…] […]