Maharashtra Muncipal Corporations Election Dates

सत्य परिचित – मुंबई (प्रतिनिधी) 15 डिसेंबर :Maharashtra Muncipal Corporations Election Dates  दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई, ठाण्यासह एकूण २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला असून १६ जानेवारीला निकाल घोषित होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात उमेदवारी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ३१ डिसेंबरला छाननी होईल. २ जानेवारी रोजी अर्ज मागे घेण्याची संधी दिली जाणार असून ३ जानेवारीला अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे.
ही बातमी देखील वाचा : मिरा-भाईंदरमध्ये शिवसेनेला मोठे बळ; मा. आमदार गीता जैन यांच्या खंदे समर्थकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Maharashtra Muncipal Corporations Election Dates : राज्यातील बहुतांश महानगरपालिकांची मुदत संपून अनेक वर्षे उलटून गेली होती. काही महापालिकांची मुदत २०२० मध्ये, तर मुंबईसह अनेक महापालिकांची मुदत २०२२ मध्ये संपली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ३१ जानेवारी २०२६ च्या अंतिम मुदतीच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने हालचालींना वेग देत आज निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

दरम्यान, निवडणूक प्रक्रियेत दुबार मतदान होऊ नये यासाठी विशेष यंत्रणा राबवण्यात आली आहे. संभाव्य दुबार मतदारांची स्वतंत्र नोंद करण्यात आली असून, त्यांना केवळ एका निश्चित मतदान केंद्रावरच मतदानाची परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.

निवडणुकीची घोषणा होताच संबंधित महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून, राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. आगामी निवडणुकांमधून कोणाच्या हाती सत्तेची किल्ली जाणार, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like

मिरा भाईंदर शहरात प्राणी मित्रांकडून भटक्या श्वानांच्या संरक्षणासाठी श्वानांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे

मिरा भाईंदर शहरात प्राणी मित्रांकडून भटक्या श्वानांच्या संरक्षणासाठी श्वानांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे…